पोलीस वसाहत जुनी असून त्याचे जीणोव्दार करून सेवारत पोलिसांना न्याय द्यावा.. महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन

0
546

पोलीस वसाहत जुनी असून त्याचे जीणोव्दार करून सेवारत पोलिसांना न्याय द्यावा.. महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन


यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
✍🏻संजय कारवटकर

यवतमाळ :-. महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन यवतमाळ च्या वतीने पोलीस मुख्यालय ब्रिटिश कालीन असून बरेच वर्षांपासून आतील रस्त्यांचे रुंदीकरण डांबरीकरण झालेले नाही..
त्यामुळे ठिक – ठिकाणी पाणी साचते व येण्या जानार्या वर ते पाणी उडून कपडे होतात तसेच वसाहत खूप जुनी असून त्यात पाणी गळती, कचरा,पाईप लिकिज गोधनी रोड ते आठवडी बाजार रोड कडील गेट खुपच लहान असल्याने साधा आॅटो पण जात नाही..
त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबातील आबाल वृध्दांना तसेच लहान मुलांना खुपच अडचणी चे ठरत आहे…जसे कोणी आजारी झाल्यास रुग्णाला नेणे – आणणे खुपच त्रास होतो.काही दिवसांनंतर मुलांची शाळा पण सुरू होईल.पण त्यांना गेटपर्यंत लांब अंतर पार करून यावे लागते.व मागचा रस्ता वर्दळीचा असल्याने मनात धाकधूक असते जर हे गेट मोठा केला तर आॅटो सरळ आतमध्ये ऐऊ शकते.. याचा सर्व पोलीस कुटुंबीयांना सोईचे होईल याचा पण विचार व्हावा तसेच काही क्वाॅटर बंद अवस्थेत जीर्ण शिर्ण असल्याने तेथे कोणीही राहत नाही..घाण कचरा साफ सफाई नियमित पणे होतं नाही.त्यामुळे डासांचा उपद्रव खूप वाढलेला आहे. सध्या कोविड१९ चा प्रादुर्भाव सुरू आहे. व पाऊसाळा सुरू असल्याने रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याचा पण विचार व्हावा.कारण पोलीस नेहमी दुसऱ्यांसाठी झटपतो तो ड्युटीवर असतो पण त्याचे मागे त्याचे कुटुंबाचे वसाहत कडे लक्ष द्यावे महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन यवतमाळ च्या वतीने मागणी करण्यात आली आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here