मुखेड परिसरात पावसाच्या थैमानाने पिकांचे प्रचंड नुकसान ; शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण

0
500

मुखेड परिसरात पावसाच्या थैमानाने पिकांचे प्रचंड नुकसान ; शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण

मुखेड (नांदेड), चंद्रकांत राजूरकर
नांदेड जिल्हा प्रतींनिधी
मोबा. 8600420232

मुखेड परिसरात गेल्या 4 ते 5 दिवसापासून संत मुसळधार पावसामुळे परिसरातील मुखेड सांगावी (बेनक), कांजळगा, वर्ताळा, सावरगाव, लादगा, जांब, इत्यादी आजूबाजूच्या परिसरातील सखल भागात जोरदार पावसाने केलेल्या प्रहारामुळे शेतकर्यांाच्या शेतीचे व पिकाचे प्रचंड नुकसान झाले व शेतकर्यााच्या पिकांवर विरजण पडले आहे. यामुळे शेतकर्यावला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. मानसून पूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकर्यां नी पेरणीस सुरवात केली असून अधून मधून हलक्या सरीमुळे पिके उभे राहिले. परंतु मधील कांही काळात पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत होते.

काही दिवसापासून पुन्हा पावसाला सुरवात झाली आणि शेतकर्यांानी मोठ्या उत्साहणे पावसाचे स्वागत केले परंतु हा आनंद जास्त काळ टिकू शेकला नाही अगोदरच झालेल्या पावसामुळे कालवे व्हाण्यास सुरवात झाली होती परंतु दिनांक 12/07/2021 रोजी पासून धो-धो कोसळणार्याव पावसामुळे मुखेड परिसरातील शेतीचे तळयात रूपांतर झाले पुन्हा एकदा हाताला येणारे पीक हे पावसाच्या पाण्यात विसर्जित झाले आहे. मुखेड व परिसरातील शेतकर्यांकच्या शेतीत पाणी शिरून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, सध्या पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळेल ही अशा सुद्धा शेतकर्या मध्ये दिसून येत नाही. कारण मागील वर्षी पीक विमा कंपनीकडून कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही अशा प्रकारच्या समिश्र प्रतिक्रिया शेतकर्याकमधून येत आहेत. नदी मोठे कालवे पुला शेजारील शेतीचे प्रचंड नुकसान प्रथमदरसीय दिसून येत आहे.

सदर नुकसानीस नैसर्गिक संकटच नाहीतर ग्राम प्रशासन ही जबाबदार आहे. मागील 3 वर्षापासून सांगावी, कांजळगा, वर्ताळा, सावरगाव, लादगा, जांब, इत्यादी परिसरातील नदी, नाले, बंदरे, नाला बल्डिंग, मृदा संवर्धन सांधर्भात कोणतीच कामे झाली नाहीत तहसीलदार साहेबांनी तालुक्यातील अशा सर्व संबंधित ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश तत्काळ द्यावेत अशी मागणी मांवहीत लोकशाही पक्ष मुखेड मार्फत करण्यात आली. यावेळी सतीश धनवाडे मुखेड ता. अध्यक्ष, स्वप्नील वाडेकर युवा ता. अध्यक्ष, देवा तोटरे संपर्क प्रमुख, अर्चना वाडेकर युती ता. अध्यक्ष, गजानन गायकवाड सो. मीडिया सचिव, वैभव मोरे विध्यार्थी आघाडी अध्यक्ष, केरबाजी गंगावणे माजी उपसरपंच (सांगावी बेणक), मिलिंद जोंधळे माजी ग्रामपंचायत सदस्य (सांगावी बेणक), मुजायद अल्ली इनामदार सावरगाव पि, रब्बानी खाॅ पठान, सावरगाव पि, रियाजोदीन मुजावर सावरगाव पि, मनावहीत लोकशाही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here