कोरपना तालुक्यातील हिरापूर कोरोनाचा नविन हॉटस्पॉट, अनेक कुटुंबांना संसर्ग

0
718

कोरपना तालुक्यातील हिरापूर कोरोनाचा नविन हॉटस्पॉट, अनेक कुटुंबांना संसर्ग

नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज

आवाळपुर, नितेश शेंडे : कोरपना तालुक्यातील आवारपूर नजीक असलेले हिरापूर गाव कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट झाला येथील अनेक कुटूंबाना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे आवारपुर बिबि नांदाफाटा हा औद्यागिक परीसर आधीच हाॅटस्पाॅट असून २० नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे हिरापुरचा वाढता संसर्ग पाहता परीसरातील नागरिकांनी अधिकची काळजी घेण्याची गरज आहे विनाकारण बाहेर पडू नये अशा सुचना वारंवार ग्रामपंचायतीकडून देण्यात येत असतांनाही नागरिक विनाकारण बाहेर फिरुन कोरोनाला आमंत्रण देऊन स्वत:चा व परीवाराचा जीव धोक्यात टाकत आहे.

ग्रामीण भागांत होम आयसोलेशन धोकादायक

कोविड आजाराची सौम्य लक्षणे असणार्‍यांना गृह विलगीकरणात राहण्याचे सांगितले जाते ग्रामीण भागात अनेक कुटुंबाकडे स्वत:ची वेगळी खोली वेगळे बाथरूम वेगळे शौचालय नाही यामुळे होम आयसोलेशन मध्ये असलेल्यांच्या कुटुबांना कोरोनाचा संसर्ग होत आहे होम आयसोलेशन मुळेच औद्योगिक परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून आता ग्रामीण भागातही धोकादायक परिस्थिती आहे.

तातडीने कोविड चाचणी केन्द्र सुरु करण्याची गरज

नांदा बिबि आवारपुरात सध्या ताप सदृश्य साथ आहे नागरीक खाजगी डॉक्टरांकडून उपचार घेत आहे डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्याच्या सुचना दिल्यावरही रुग्ण भीतीपोटी वेळेवर तपासणी करत नसल्याने संसर्ग वाढत आहे परीसरात गढचांदूर येथे एकच कोविड चाचणी केन्द्र असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे नांदाफाटा येथे कोविड चाचणी केन्द्र सुरु झाल्यास टेस्टींग वाढतील नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य अभय मुनोत यांनी टेस्टींग सेंटर सुरु करण्याबाबात आमदार सुभाषभाऊ धोटे यांचेकडे मागणी केली असून याठिकाणी तातडीने कोविड चाचणी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे मोठ्या संख्येने आशावर्कर असूनही यांचेमार्फत आरोग्य विभाग विशेष अशी कुठलीही उपाययोजना करत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here