देशाच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंती निमीत्य यंग चांदा ब्रिग्रेडच्या अल्पसंख्याक महिला आघाडीच्या वतीने मार्गदर्शन, सत्कार आणि मकरसंक्रात कार्यक्रमाचे आयोजन

0
406

देशाच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंती निमीत्य यंग चांदा ब्रिग्रेडच्या अल्पसंख्याक महिला आघाडीच्या वतीने मार्गदर्शन, सत्कार आणि मकरसंक्रात कार्यक्रमाचे आयोजन

 

 

देशाच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंती निमीत्य आज यंग चांदा ब्रिग्रेडच्या अल्पसंख्याक महिला आघाडीच्या वतीने मार्गदर्शन, सत्कार आणि मकरसंक्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फातिमा शेख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ. नसरिन मवानी, डॉ. जेबा निसार, किदवाई शाळेच्या मुख्याध्यापिका नियाज खान, यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक महिला आघाडी शहराध्यक्ष कौसर खान, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, आदि मान्यवरांची मुख्य अतिथी म्हणून मंचावर उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाला मुस्लिम महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सामाजिक सुधारणेच्या कार्यासाठी जगभरात ओळखल्या जाणा-या फातिमा शेख यांची जयंती यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते देशाच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पुढील कार्यक्रमांना सुरवात झाली. यावेळी संघर्ष से शिखर पर्यंत प्रवास करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रिफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मकरसंक्रात कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिलांनी एकमेकांना वाणांची देवाणघेवाण केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देशाच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जिवनशैलीवर प्रकाश टाकला. देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सोबत काम करत फातिमा शेख यांनी त्याकाळी उभारण्यात आलेल्या शिक्षण चळवळीत महत्वपूर्ण योगदान दिले. फातिमा शेख यांनी शाळेसाठी जागाही दिली. त्यामूळे त्यांचे हे योगदान समाज कधीही विसणार नाही. त्यांनी त्याकाळी सुरु केलेली चळवळ आता महिलांनी पुढे न्यावी शिक्षणाबाबत जागृत रहावे असे यावेळी बोलतांना प्रा. नियाज खान यांनी सांगीतले तर महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये, सदृढ राहावे असे आवाहण यावेळी बोलतांना डॉ. मवानी यांनी उपस्थित महिलांना केले. यावेळी इतर मान्यवरांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या शमा काजी, राबिया शेख, जासमीन शेख, आशा देशमूख, दूर्गा वैरागडे, वैशाली मद्दीवार, नंदा पंधरे, विमल कातकर, रुपा परसराम यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन रुबिना शेख तर आभार प्रदर्शन शमा काजी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here