राजुरा गोळीबारान हादरलं, महिला मृत तर एक इसम जखमी

0
712

राजुरा गोळीबारान हादरलं, महिला मृत तर एक इसम जखमी


राजुरा (चंद्रपूर), 23 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात आज गोळीबार झाला. यात एक महिला मृत तर एक इसम जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडल्याचे वृत्त आहे.

राजुरा शहरातील सचिन डोहे यांच्या घरी बंदुकीने गोळीबार झाला असून सचिन डोहे यांची पत्नी पूर्वाशा सचिन डोहे ही ठार तर लल्ल्या नामक इसमाला गोळी लागून जखमी झाल्याचे वृत्त आहे. गोळीबार नंतर अज्ञात घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. या खळबळजनक घटनेने राजुरा शहर चांगलेच हादरले आहे.

शहरातील सोमनाथपुर येथे हि घडली. लल्ली नामक व्यक्तीला मारण्यासाठी बाहेरून अज्ञात आले होते. लल्ली स्वतःचा जीव वाचविण्यासाठी सचिन डोहे यांच्या घरी गेला. यावेळी अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. याचवेळी घरातून बाहेर आलेल्या पूर्वशा डोहे यांना एक गोळी लागली तर लल्ली याला एक गोळी पाठीला लागून गेली. यात तो गंभीर जखमी झाला. गोळीबार करणारे अज्ञात घटनास्थळावरून पसार झाले. दोघानाही उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे हलविले असता डॉक्टरांनी पूर्वाशा डोहे हिला मृत घोषित करण्यात आले, असे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here