कोरपना च्या विकासासाठी काँग्रेसला साथ द्या : विजय वडेट्टीवार

0
388

कोरपना च्या विकासासाठी काँग्रेसला साथ द्या : विजय वडेट्टीवार

कोरपना, प्रवीण मेश्राम
काँग्रेसच्या सत्ता काळातच कोरपना शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे. आणि यापुढे ही काँग्रेसच शहराचा चेहरा-मोहरा बदलू शकते यासाठी काँग्रेसच्या हाती सत्ता द्या असे आवाहन राज्याचे बहुजन कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरपना येथे नगरपंचायत निवडणूकिनिमित्य आयोजित प्रचारसभेत केले.

याप्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, काँग्रेस कमिटी चे प्रकाश देवतळे, राजुरा नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदुर नगराध्यक्ष सविता टेकाम, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीधरराव गोडे, जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष विठ्ठल राव थिपे, जिल्हा परिषद सदस्या कल्पना पेचे, वीणाताई मालेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे, सिताराम कोडापे, पंचायत समिती सदस्य श्याम रणदिवे, संभाजी कोवे, दिनकर मालेकार, माजी सरपंच भाऊराव कारेकर, माजी सभापती भारत चने, वहाबभाई, रहेमानभाई, भाऊराव चव्हाण, सुरेश मालेकार , गणेश गोडे, नितीन बावणे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. आमदार धोटे यांनी ही आपल्या भाषणात कोरपना शहरात केलेल्या आज पर्यंत विकास कामाचा आढावा सांगितला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, संचालन आशिष देरकर, आभार उमेश राजूरकर यांनी केले. या प्रचार सभेला मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व कोरपना वासियांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here