सावकारीच्या जाचाला कंटाळून आटोचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
595

सावकारीच्या जाचाला कंटाळून आटोचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

बल्लारपूर प्रतिनिधी -प्रा.महेंद्र बेताल

आज दि.31/07/2021 ला सकाळी 9:00 वाजताच्या सुमारास विद्यानगर वार्ड बल्लारपूर येथील सुशांत उर्फ बाळु भिमराव झाडे वय 45 यांनी सावकार व बचतगट यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.
सकाळी आपल्याच घरातील छताला दोरी बांधून स्वतःची जिवनयात्रा संपवली. सदर व्यक्ती आटोचालकाचा व्यवसाय करीत असल्याने लाकडाऊनच्या काळात धंदे नसल्याने त्यांच्यावर कर्ज फेडण्यासाठी पैसे नव्हते काही गटवाले वारंवार पैसे मागणी चा तगादा लावत होते.तसेच काही दिडिचा व्यवसाय करणारे सावकार देखील आटो उचलून न्यायची धमकी देत होती. म्हणून स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केली. अशी माहिती त्यांच्या काही आप्तेष्टांकडून प्राप्त झाली.
बल्लारपूर येथे बचत गट व बिनालायसन सावकारीचे पेव फुटले आहे.याची ही बल्लारपूरात पहिली घटना आहे. वेळीच यांच्यवर अंकुश लावणे गरजेचे आहे नाहीतर अशा घटना वाढत जातील. अशी प्रतिक्रिया आटोचालक मालक संघटनेचे विदर्भ पदाधिकारी यांनी बोलताना सांगितले.आणि दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी बल्लारपूरचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे आटोसंघटनेच्या पदाधिकारी यांनी केली. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तातडीने अंत्यविधीसाठी 10000 रोख त्यांच्या परिवाराला मदत म्हणून विदर्भ चालक मालक संघटनेच्या अध्यक्ष व सचिव मार्फत परिवाराला दिली.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली तथा आईवडील आहेत. स्वभावाला चांगला असल्याने परिसरातील लोक हळहळ व्यक्त करीत आहेत.
पुढील तपास बल्लारपूर पोलिस निरीक्षक उमेश पाटील साहेब करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here