शहरात वन्य प्राण्यांचा सतत हैदोस, पण वनमंत्री आणि प्रशासन गप्प का? – आप, शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार

0
92

शहरात वन्य प्राण्यांचा सतत हैदोस, पण वनमंत्री आणि प्रशासन गप्प का? – आप, शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार

 

बल्लारपूर, 13/03/2024 
शहरात सतत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे.आज पुन्हा वन्य प्राण्याकडून पंडित दिनदयाल वार्डातील 7 वर्षीय चिमुकली साफिया इकबाल शेख घराजवळ खेळत असताना बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी चिमुकलीच्या कुटूंबाची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने पेपरच्या बांबू स्टाॅक यार्ड बाबत उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. या स्टाॅक यार्डमुळे वन्य प्राण्यांना शहरात लपून राहणे सोपे होते. व इथूनच वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे. नागरिकांवर वन्य प्राण्यांकडून होत आहेत. यावर स्थानिक आमदार ज्यांच्यावर वनमंत्री पदाची जबाबदारी आहे ते गप्प का आहेत? यावर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना का केले जात नाही? केव्हा पर्यंत नागरिकांचा अश्या प्रकारे वन्यप्राण्यांमुळे धोक्यात राहिल असा सवाल रविभाऊ पुप्पलवार यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here