युवासेना पोंभुर्णा ची पदाधिकारी,कार्यकर्ता संवाद,आढावा बैठक संपन्न

0
562

युवासेना पोंभुर्णा ची पदाधिकारी,कार्यकर्ता संवाद,आढावा बैठक संपन्न

 

पोंभुर्णा प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य पर्यावरण पर्यटक मंत्री, युवासेनप्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशानुसार , कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, विस्तारक त्रिपाठी, शिवसेना जिल्हाप्रमूख संदिप गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात युवासेना पोंभुर्णा तालुका व शहर पदाधिकरी बैठक घेण्यात आली. या बैठकीला युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखडे,जिल्हा चिटणीस विनय धोबे,व युवासेना समन्वयक विक्रांत सहारे,सुरज घोंगे व पोंभुर्णा शिवसेना शहर प्रमुख गणेश वासलवार यांच्या प्रमुख उपस्थित बैठक घेण्यात आली.यावेळी तालुक्यातील व शहरातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित दर्शवून तालुक्यातील प्रत्येक गावा-गावात युवासेनेची शाखा व युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन न्याय मिळवून देने,व आदी संघटना वाढी बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.यावेळी मार्गदर्शन ही करण्यात आले.

सदर बैठक तालुका प्रमुख अभिषेक बद्दलवार,शहर प्रमुख महेश श्रिगिरिवार,यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी उपसरपंच शंकर वाकूडकर,अमोल कावटवार,अमोल पावडे,लोकाजी दामपेल्लीवार,नितीन येरोजवार,साहिल पोरते,अभय सातपुते ग्रा.प.सद्स,सुरज पदमगिरीवार,अंकुश गव्हारे,अक्षय सोनूले,सुरज कावळे,राकेश मोगरकर,आशिष कावळे,प्रफुल गव्हारे,राजू कानपेलीवार,सुधिर ढोले,अजय गुरूनुले,दिनेश गुरुनले,आकाश निखोडे,छ्त्रीपती कस्तुरे,स्वप्निल गोरतवार,सुधिर ढोले,भुपाल आक्केमवार,अमित कानपेलीवार,रुपचंद गुरूनुले, प्रविण गुरुनुले,अतुल मोरे व आदी मोठ्या प्रमाणात युवासैनिक उपस्थीत होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here