पुढच्या पिढीसाठी पाण्याचा एक एक थेंब वाचावा…!

0
407

पुढच्या पिढीसाठी पाण्याचा एक एक थेंब वाचावा…!

वडगाव परिसरातील अमृत पाणीपरवठा योजनेचे महापौरांनी केले उदघाटन

 

चंद्रपूर । पिण्याचे पाणी भविष्यासाठी आवश्यक आहे. पुढल्या पिढीला जगवायचे असेल तर आजच पाण्याचा एक एक थेंब वाचावा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. वडगाव परिसरातील अमृत झोन 18 मधील शिवनगर, साईनागर येथील योजनेचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पण सोहळा मंगळवार, ता. 8 फेब्रुवारी रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.

वडगाव प्रभागातील श्री. चौधरी यांच्या निवासस्थानी झालेल्या लोकार्पण सोहळ्याला उपमहापौर राहुल पावडे, सभागृह नेता देवानंद वाढई, नगरसेविका सुनिता लोढिया, नगरसेवक पप्पू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील पाईपलाईन उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, नागरिकांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा सुरु होणार आहे. यावेळी महापौर म्हणाल्या, जल हे अमृत आहे. त्याचा आवश्यकतेनुसारच वापर केला पाहिजे. आपण भूमातेच्या उदराला छिद्र करून पाणी घेतो. मात्र, त्या जलाची परतफेड झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची गरज आहे. वाहून जाणारे सांडपाणीदेखील मनपाच्या माध्यमातून शुद्ध करण्यात येत आहे. या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी रेड टँकर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

मंगळवारी पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याला उपअभियंता विजय बोरीकर, शाखा अभियंता संजय जोगी यांच्यासह दशरथ चौधरी, श्री. कुत्तरमारे, श्री. खामणकर, श्री. वडस्कर, श्री. मानकर, श्री. टोंगे, श्री. चिकनकर, श्री. ढवस, श्री. गौरकर, श्री. माकडे, श्री. कौरासे,श्री. शिंदे, श्री. मंथनवार, श्री. गावंडे, श्री गाडे, श्री चन्ने, श्री.चौधरी, सौ. पिंपळकर, सौ. चिकनकर, सौ. कोंडेकर, सौ. कौरासे आदी स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here