आयसोलेश वार्डमध्ये गंभीर रूग्णाकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष

0
221

आयसोलेश वार्डमध्ये गंभीर रूग्णाकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष

यवतमाळ जिल्हा

यवतमाळ येथील आयसोलेशन वार्डमध्यें कोरोनाचे उपचार घेत असलेले उमरखेड येथील काही लोकांनी आपली आपबिती कथन केली आहे. उमरखेड येथील वयोवृध्द रूग्णांची स्थिती गंभीर आहे, त्यांचेकडे कोणी डॉक्टर, नर्स लक्ष देण्यास तयार नाही. कालच एका रूग्णाने सोशलमिडयावर पोस्ट वायरल करून येथील स्‍थिती संपुर्ण जगाचे लक्षात आणून दिली होती.
यानंतर लगेच येथील वृध्द रूग्णांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची आपबिती सोशल मिडिया द्वारे सांगीतली. याबाबत वारंवार आवाज उठवूनसुध्दा प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही. यावरून असे वाटते जे वयोवृध्द रूग्ण आहेत त्यांना केवळ मरण्यासाठीच येथे सोडून द्यायचे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबधितांनी गंभीर दखल घेवून योग्य ती कार्रवाई करावी अशी मागणी संबधीत रूग्णाचे नातेवाईकांनी केली आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here