वणी येथील सेतु सेवा केंद्रात प्रचंड भ्रष्टाचार, आपलीच कागदपत्रे आपल्यालाच घ्यावी लागते विकत

0
499

वणी येथील सेतु सेवा केंद्रात प्रचंड भ्रष्टाचार, आपलीच कागदपत्रे आपल्यालाच घ्यावी लागते विकत

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले 

वणी येथील आपले सरकार सेतु सेवा केंद्रात अत्यंत भोंगळ कारभार निदर्शनास आला आहे. विध्यार्थी सेतू सेवा केंद्रात जातात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला काढण्यासाठी गेले असता,सर्व्हिस इन्फॉर्मेशन चे नावावर जी पावती दिली जाते, त्यावर पेमेंट मोड जी आहे ती cash असे लिहलेले असते, मात्र किती पैसे घेतले त्याची नोंद नसते याचा अर्थ या ठिकाणी पैसे उखळण्याचा गोरख धंदा अनेक दिवसांपासून सुरू आहे, सब या ठिकाणी अधिकारी या बाबी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचे सिद्ध होते.

तसेच सेतू केंद्रातील नितीन वैद्य क्लार्क अनेक दिवसांपासून एकाच टेबलावर असल्याने ते सुद्धा मनमर्जी सारखे वागत असल्याने तेथील व्यवस्था प्रभावीत झाली आहे.आणी उपविभागीय अधिकारी वणी यांची DSC certificate exfayar झाल्याने सेतू सेवा प्रभावीत झाली आहे या साठी जवाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

या व्यतिरिक्त अनेक तक्रारी सेतू सेवा केंद्रा संदर्भात ऐकण्यात येत आहे, कागदपत्रे तात्काळ काढून देण्या संदर्भात जास्त पैशाची मागणी करण्यात येत असते.

या सर्व प्रकारच्या तक्रारी ची दखल घेवून दोषी वर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना वणी शहर चे वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कडे करण्यात आली आहे.यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकार,अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हाप्रमुख , ललित लांजेवार माजी युवासेना शहर प्रमुख, विलास कोलेकर , प्रवीण खांनझोडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here