कविटपेठ येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी रामदास दुर्योधन यांची निवड

0
571

कविटपेठ येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी रामदास दुर्योधन यांची निवड

राजुरा, १८ सप्टेंबर : ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामसभा अत्यंत महत्वपूर्ण भूमिका निभावते. लोकसहभागातून गावाच्या विकासाची दिशा ग्रामसभेत ठरविली जाते. तंटामुक्त समिती गावात सलोखा व सामंजस्य राखण्यात महत्वाची समिती म्हणून मानली जाते. कविटपेठ येथे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली १४ तारखेला ग्रामसभा संपन्न झाली. यात तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी सर्वानुमते रामदास धोंडू दुर्योधन यांची निवड करण्यात आली.

रामदास दुर्योधन सामाजिक कार्यात नेहमी समोर असून सामान्य जनतेच्या अडीअडचणीत नेहमी सहकार्यासाठी पुढे असतात. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव व वाद-तंटे सोडविण्यात निर्णयाची सचोटी ग्रामविकासात भर पाडेल. या आशेने उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. सदर सभेला सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here