विसापूर येथे भव्य जिल्हास्तरीय कनिष्ठ गट अथलेटिक्स स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन

0
274

विसापूर येथे भव्य जिल्हास्तरीय कनिष्ठ गट अथलेटिक्स स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन

ज्युनियर गटात – 14,16,18 व 20 वर्षा आतील खेळाडू तर सब ज्युनियर गटात – 8, 10 व 12 वर्षा आतील खेळाडू घेऊ शकतील भाग

राजुरा – महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय कनिष्ठ गट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन रत्नागिरी व पुणे येथे होणार आहे. करिता वयोगट 20, 18, 16, 14, 12, 10 व 8 वर्षा खालील मुले व मुली यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व राज्य स्तरीय स्पर्धे करिता निवड चाचणी चे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा 2 व 3 सप्टेंबर 2023 रोजी रोजी सकाळी 9 वाजता तालुका क्रीडा संकुल सिंथेटिक स्टेडियम विसापूर तालुका बल्लारपूर च्या पटांगणात आयोजित केलेली आहे.खेळाडू सदर स्पर्धेत 50मी, 60मी, 100मी, 200मी, 400मी, 800मी, 1500मी, 5000मी, 10000मी धावणे, 20000मी चालणे, थाळी, गोळा, भाला फेकणे, लांब उडी व तिहेरी उडी, तसेच अनेक इतर खेळबाब स्पर्धेत भाग घेता येईल. विजयी प्रथम दोन खेळाडूंना चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटने तर्फे राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होता येईल. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता खेळाडूंना ए.एफ.आई. नोंदणी क्रमांक, जन्माचा दाखला, आधारकार्ड , नोंदणी शुल्क व 2 पासपोर्ट छायाचित्र असणे अनिवार्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धा आयोजक श्री सुरेश अडपेवार 9822449916, कु. पूर्वा खेरकर 9552486804, प्रा. संगीता बांबोडे 9271455198 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here