विदर्भाच्या प्रशिल ने रचला इतिहास

0
284

विदर्भाच्या प्रशिल ने रचला इतिहास

महाराष्ट्राचा बेअर ग्रिल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशिल जयदेव अंबादे ने सर केला जगातील सर्वात उंच शिखर (स्टॅंड अलोन माऊंटेन – stand alone mountain) जो दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील माउंट किलीमांजारो (Kilimanjaro) ज्याची उंची समुद्र सपाटी पासून ५८९५ मीटर इतकी आहे. आणि माऊंट किलीमांजारो सर करणारा प्रशिल जयदेव अंबादे हा विदर्भातील पहिला व्यक्ती ठरला आहे.

प्रशिल हा मूळचा विदर्भातील चंद्रपूर मधील रहिवासी असून सध्या २ वर्षापासून सह्याद्री डोंगर रांगेची भटकंती करत आहे.

लहानपणापासून इतिहास विषयाची आवड आणि ट्रेकिंग चा छंद असल्याकारण साध्या सोप्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास लोकांपर्यन्त youtube channel च्या माध्यमातून पोहचविण्याचे काम करत आहे.

गेल्या २ वर्षात २०० हुन अधिक किल्ले सर् करून sahyadri Rock adventure या team सोबत सह्यद्रीतील (वजीर सुळका वानरलिंगी सुळका अलंग मदन कुलंग यांसारखे अनेक कठीण समजल्या जाणाऱ्या ठिकाणी आरोहण करून लोकांमध्ये adventure बद्दल जनजागृती करण्याचे काम psycho prashil या youTube channel च्या माध्यमातून काम करीत आहे.

जगातील सर्वात उंच शिखर म्हटलं तर आठवतो तो म्हणजे, माउंट एव्हरेस्ट. पण एव्हरेस्ट हा हिमालयाच्या पर्वत रांगेतील एक उंच शिखर आहे

आणि जगातील सर्वात उंच शिखर (स्टॅंड अलोन माऊंटेन – stand alone mountain) म्हणून आहे तो दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील माउंट किलीमांजारो (Kilimanjaro) ज्याची उंची समुद्र सपाटी पासून ५८९५ मीटर इतकी आहे.

आणि या शिखराला सर करून प्रशिल ने एक नवीन विक्रमी नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here