गजानन कासावार यांची राज्यपालांकडून अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती

0
158

गजानन कासावार यांची राज्यपालांकडून अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती

वणी:- येथील उच्च श्रेणी राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन तुकाराम कासावार यांची अमरावती विद्यापीठावर मा. राज्यपालांनी सिनेट सदस्य म्हणून पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.

गजानन कासावार हे विद्यार्थी जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते एक उत्कृष्ठ अध्यापक म्हणून ओळखले जातात. ते विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनामध्ये सक्रिय सहभागी आहेत. सावित्रीबाई फुले दत्तक पालक समितीच्या माध्यमातून सन 2001 पासून आर्थिक दृष्टीने मागास 300 ते 325 मुलींना शैक्षणिक दृष्ट्या समाज सहभागातून दत्तक घेऊन दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे पालकांच्या हस्ते वाटप करीत असतात. ते विदर्भ साहित्य संघाचे स्थानिक उपाध्यक्ष आहेत. भारतीय शिक्षण मंडळात विदर्भ प्रांताचे प्रकाशन सह प्रमुख आहेत. विदर्भ नगर परिषद शिक्षक संघटनेचे ते केंद्रीय कार्याध्यक्ष आहेत. येथील नगर वाचनालायत सचिव या नात्याने मागील 15 वर्षांपासून विविध उपक्रम राबवित असतात. 2001 मध्ये त्यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ते विविध वृत्तपत्रातून लिखाण करीत असतात. वणी येथे संपन्न झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनानिमित्त निघालेली स्मरणिकेचे त्यांनी संपादन केले आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here