देवगाव बु येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा.    

0
576

 उस्मानाबाद जिल्हासंपादक – ✍🏻अमोल मुसळे   

   मो.9405608508 

उस्मानाबाद/ परांडा- परांडा तालुक्यातील देवगाव बु येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयामुळे प्रत्येक ग्रामपंचायत ,पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात 6 जून रोजी शिव राज्याभिषेक शिवस्वराज्य दिन साजरा होत आहे .

देवगाव बु ग्रामपंचायत कार्यालय येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला ,उच्च प्रतीचा भगवी जरी पताका ध्वज उभारून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत घेऊन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी देवगाव बु गावच्या सरपंच सौ. पुजा दत्ता ठाकरे, उपसरपंच सुग्रीव कदम ,देवगाव जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्यधापक तथा केंद्रप्रमुख देवकर सर , ग्रामसेवक नाईकनवरे , तलाठी मसुडगे मॅडम , आशा सेविका जाधव मॅडम, आत्रे मॅडम, गंधे मॅडम ,ग्रामपंचायत सेवक अमोल कदम ,भाजपा युवा तालुका उपअध्यक्ष दत्ता ठाकरे , मेजर पांडुरंग ठाकरे , आकाश ठाकरे, माऊली ठाकरे , संतोष ठाकरे ,सागर जाधव पत्रकार अमोल मुसळे व इतर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here