काँग्रेस नेते संतोष रावत यांच्या हल्लेखोरांना तातळीने अटक करा : राजुरेड्डी

0
306

काँग्रेस नेते संतोष रावत यांच्या हल्लेखोरांना तातळीने अटक करा : राजुरेड्डी

ठाणेदारांना निवेदनातून मागणी

घुग्घुस : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्यावर मध्यवर्ती सहकारी बँके मूल परिसरात काल रात्रीच्या वेळेस काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

नशीब बलवत्तर म्हणून रावत वाचले या घटनेने सर्वसामान्य नागरिकांत दहशत तर कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला या भ्याड हल्ल्यातील आरोपींना तातळीने अटक करून कारवाई करा ही मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व इंटक नेते लक्ष्मण सादलावार यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळाने घुग्घूस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षकांना करण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,सुधाकर बांदूरकर,अलिम शेख,रोशन दंतलवार,रोहित डाकूर,देव भंडारी,सुनील पाटील, रफिक शेख,साहिल सय्यद,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here