शहर पोलिसांनी लावला ‘या’ साहित्य चोरीचा छडा : 7 लाखांच्या साहित्यांसह दोघांना अटक

0
294

शहर पोलिसांनी लावला ‘या’ साहित्य चोरीचा छडा : 7 लाखांच्या साहित्यांसह दोघांना अटक

चंद्रपूर :- चोरी करणारे कोणती वस्तूंची चोरी करतील याचा अंदाज घेणे या कारवाई वरून लावणे कदाचित कठीणच झाले असे वाटेल कारण चंद्रपूर शहर पोलिसांनी चक्क घर बांधकामात वापरण्यात येणाऱ्या बिल्डिंग मटेरियल साहित्यापैकी मिक्सर मशीन व ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 7 लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

घर बांधकाम ठेकेदार तिजबाई रोहित कुमार देवांगण यांच्या मालकीची बिल्डिंग मटेरियल मिक्सर मशिन बाबूपेठ परिसरातील बायपास मार्गावर दिनांक 15 एप्रिल रोजी ठेवली असता दुसऱ्या दिवशी सदर ठिकाणी मशीन न आढळल्याने आजूबाजूला शोध घेतला परंतु मशीन मिळून न आल्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

गुन्ह्याचे गांभीर्य बघता शहर पोलीस ठाण्याचे सपोनि मंगेश भोंगाडे व गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल होऊन परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले असता एका ट्रॅक्टरला मशीन जोडून नेताना आढळून आले पोलिसांनी त्यादिशेने तपास केला असता राजूरा तालुक्यातील तुलाना येथे आढळून आले त्यावरून आरोपी गुड्डू उर्फ कमल उर्फ राहूल श्रवण निषाद वय 33 वर्ष रा. रमाबाई नगर, अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर व विशाल मारोती मडावी वय 33 वर्ष, रा. तुलाना, पोस्ट विरूर (स्टे) अश्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. यात बिल्डिंग मटेरियलची मिक्सर मशीन, ढलाई काँक्रीट मशीन, ढलाई काँक्रीट लिफ्ट मशीन, एक स्वराज माजदा ट्रॅक्टर असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेसी , अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीषसिंह राजपुत , सहाय्यक पुलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथक कर्मचारी शरीफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंत चुनारकर, सचीन बोरकर , संतोष पंडित, चेतन गजललवार, इम्रान खान, इर्शाद खान, दिलीप कुसराम, संतोष कावड़े, रूपेश रणदिवे यांनी केली आहे.

पुढील तपास पोहवा महेंद्र बेसरकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here