कंत्राटी कामगारांचे चंद्रपूरात डेरा आंदाेलन सुरुच ! आंदोलनाचा आजचा ८वा दिवस !अद्याप शासनाने या कडे लक्ष वेधले नाही !

0
492

कंत्राटी कामगारांचे चंद्रपूरात डेरा आंदाेलन सुरुच ! आंदोलनाचा आजचा ८वा दिवस !अद्याप शासनाने या कडे लक्ष वेधले नाही !

🟡🟢🔴चंद्रपूर🌀🟣🟢🔴किरण घाटे🟡जिल्हा प्रतिनिधी🟣चंद्रपूर🟡तब्बल सात महिण्यांपासून चंद्रपूरातील मेडीकल काँलेज व स्थानिक शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे वेतन न झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे .वारंवार या संदर्भात कंत्राटी कामगारांनी आपला आवाज बुलंद केला परंतु त्यांना याबाबत याेग्य न्याय शासनाकडुन अद्याप मिळाला नाही . 🔴🟢🔶🔵🟡🟠🟣🟤🔴गेल्या आठवड्या पासून त्यांचे कुंटुबासह जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ डेरा आंदोलन सुरु असुन आज साेमवार दि.२५फेब्रुवारीला या आंदाेलनाचा आठवा दिवस असल्याचे कामगारांनी या प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान सांगितले .🔴🟡🟢🟣🟠🔶🟤🟣काेराेना सारख्या महासंकटात या कामगारांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता दिवस रात्र इमाने इकबारे काम केले .परंतु आज त्यांना स्वताच्या वेतनांसाठी आंदोलन करावे लागत आहे हे त्यांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. 🟡🟣🔴🟢🟤🟢🟣🟠🟡 कामगार वर्गांच्या या परिस्थितीचा विचार करता प्रशासनाने या कडे काळजीने लक्ष पुरवावे अशी चंद्रपूरकरांची देखिल अपेक्षा आहे .🟢🟣🟡🔴🔶🟠🟤🔵🔴वेतन नसल्यामुळे कंत्राटी कामगारांना आपल्या कुंटुबाचा उदार निर्वाह करणे कठीण झाले आहे .🟣🔴🟡🟢🟤🟠🔵🔶🟢कामगारांच्या या मागण्यांसाठी जनविकास कामगार संघाचे सर्वेसर्वा व चंद्रपूर मनपा चे विद्यमान नगर सेवक पप्पू देशमुख यांचे नेत्रूत्वाखाली हे डेरा आंदोलन सुरु आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here