‘धम्मदेसणा’ च्या कार्यक्रमाने बुद्ध पूर्णिमा साजरी

0
451

‘धम्मदेसणा’ च्या कार्यक्रमाने बुद्ध पूर्णिमा साजरी


राजुरा : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ५ मे 2023 रोजी 2585वी बुद्ध पौर्णिमेचे आयोजन डॉ. आनंद रायपूरे यांच्या खाली जागेवर मोठ्या उत्साहात चुनाभट्टी वार्ड, शिवाजीनगर वार्ड, साईनगर वार्ड मिळून करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ पथाडे सामाजिक कार्यकर्ता, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुल कळस्कर व यशवंत सायरे वरोरा यांनी धम्मदेसना दिली.धम्म देसनेच्या कार्यक्रमानंतर स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला,कार्यक्रम संपल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट भीमराव दुर्गे आणि प्रास्ताविक अमोल राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रेयस गोंगले यांनी केले. कार्यक्रमास चुनाभट्टी वॉर्ड,शिवाजीनगर वॉर्ड व साईनगर वार्ड येथील बौद्ध उपासक व उपासीका बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता बंडू नळे, दिगंबर उमरे, विनोद बारशिंगे, सतीश ठेंगरे, विलास करमणकर, प्रभुदास वनकर विठ्ठल धोटे,सिद्धार्थ नळे, चंद्रशेखर चांदेकर,महेंद्र झाडे, सुधाकर वनकर, सिंधू बारशिंगे, रेखा वनकर, प्रेमीला नळे, संगीता करमनकर, चंदा वनकर शुभांगी धोटे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here