ग्रामपंचायत कोलारा (तु) येथे प्रथमच युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलने फडकवला झेंडा

0
614

ग्रामपंचायत कोलारा (तु) येथे प्रथमच युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलने फडकवला झेंडा

शोभा धनराज कोयचाडे सरपंच पदी तर सचिन डाहूले उपसरपंच पदी निवड

विकास खोब्रागडे

चंद्रपुर /- माजी सरपंच प्रकाश पाटील ,किशोर येरमे, यांच्या नेतृत्वाखाली युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा स्पष्ट बहुमताने विजय प्राप्त करीत सौ शोभाताई धनराज कोयचाडे सरपंच पदी निवड तर युवा नेतृत्व सचिन प्रकाश डाहूले यांची उपसरपंच पदी निवड झाली श्री.गणेश गजानन येरमे,नवनिर्वाचित सदस्य सौ सोनु हरिदास वैद्य नवनिर्वाचित सदस्या सौ. प्रियंका किशोर भरडे नवनिर्वाचित सदस्या उपस्थित होते मागील 1 वर्षापासून ग्रामपंचायत निवडणूकीची तयारी सुरू केली होती. सर्व ग्रामवासीयाना विश्वासात घेऊन विकासाचा आराखडा तयार केला पुरुष, महिला, जेष्ठ,युवक जनसंपर्क वाढवून आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आणि युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या नावाखाली आम्ही निवडणूक लढवली आणि निवडणूक सुद्धा जिंकलो.ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केल आणि आमच्या सोबत राहून आम्हाला मार्गदर्शन केल त्या सर्वांचा श्रेय आहे. आपण जो विश्वास आमच्याकडे दिला त्या विश्वासाला कधी तळा जाऊ देणार नाही.असे मत नवनिर्वाचीत उपसरपंच सचिन डाहूले यानी दिला दिनाक १२/२/२०२१ ला ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच ,उपसरपंच बहूमत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यामध्ये सरपंच पदाकरीता युवा ग्रामविकास परीवर्तन पॅनल कडून सौ शोभा कोयचाडे सरपंच पदाकरीता, सचिन डाहूले उपसरपंच पदाकरीता आणि ग्रामविकास पॅनल कडून सौ. अरुणा चौधरी सरपंच पदाकरीता तर अविनाश गणविर उपसरपंच पदाकरीता अर्ज सादर केले त्यामध्ये सौ शोभा कोयचाडे याना 5 (पाच) मते तर सौ अरुणा चौधरी याना 4 (चार) मते मिळाले , सौ शोभा कोयचाडे पाच मते घेत विजय झाल्यात ,उपसरपंच पदाकरीता सचिन डाहूले याना 5 (पाच) मते तर अविनाश गणविर याना 4(चार) मते मिळाले सचिन डाहूले पाच मते घेत विजय झाले त्यामुळे शोभा कोयचाडे सरपंच पदी निवड तर सचिन डाहूले यांची उपसरपचं पदी निवड करण्यात आली ,निवडणुक निर्णय अधिकारी आखाडे, तलाटी घाटे,महसुल विभाग सचिन डाहूले साहेब,निवडणुक विभाग प्रमुख लोखंडे साहेब,ग्रामसेवीका गेडाम मॅडम,तर सुंजय गुळधे, प्रफुल वाघमारे,शत्रुघन दडमल यांच्या उपस्थितीत निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली सर्व मतदार बंधू आणि भगिनी युवा ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सोबत राहून प्रचंड बहुमतांनी निवडून दिल्या बद्दल आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल कोलारा तु समस्त जनतेचे मनःपूर्वक आभार.युवकांच्या निवडीने गावात कौतुक केला जात आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here