वढोलीत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

0
614

वढोलीत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

गोंडपीपरी : ६ जून १६७४ ला छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा झाला होता. तेव्हापासून ६ जून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केल्या जातो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ६ जून हा दिवस आता संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे निर्देश दिले होते.
त्याच अनुशंगाने जिरेटोप, सुवर्णहोणं, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असा ध्वज वढोली ग्रामपंचायत ने उभारून शिवस्वराज्य दिन साजरा केला. यावेळी सरपंच राजेश कवठे, ग्रामसेवक विनोद झिले, आरोग्यसेवक रामटेके, धाबा वैधकीय अधिकारी प्राणिल पत्रीवार, ग्राम पंचायत सदस्य संदीप पौरकार, सुरेंद्र मडपल्लीवार, खरबनकर, भारत लांबाडे, मोरेशवर उपासे, मंगेश गेडाम, सामाजिक कार्यकर्ता सुरज माडुरवार यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here