सावित्रीबाई जयंती निमित्त एक विशेष -पत्रलेखन: मी सावित्रीचा लेक बोलतोय !

0
530

सावित्रीबाई जयंती निमित्त एक विशेष -पत्रलेखन: 🟣💠🟡🌼मी सावित्रीचा लेक बोलतोय !

☀️🌀भूषण सहदेव तांबे
बिल्डिंग क्रमांक २२, रूम क्रमांक २२,
हिंदमाता कॉलनी,
कांदिवली (पश्चिम)
मुंबई – ४०० ००७

दिनांक: २७ डिसेंबर २०२०

विषय: आपल्या सर्वोच्च योगदानाच्या आठवणींना उजाळा
**************************
आदरणीय माता सावित्रीबाई,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

☀️🌼🌀पत्रास कारण की, आपल्या सर्वोच्च योगदानाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्याबद्दल शब्दालंकारातून व्यक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करत आहे. होय, मी तुमचाच एक लेक बोलतोय जो सध्या महाराष्ट्रातील मुंबई शहरात स्थायिक आहे. ☀️🟢🟣लहानपणापासूनचं मी आपला आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आणि त्याचमुळे आज न थांबता मी माझे BMS, Mcom, MMM/MBA हे शिक्षण सकारात्मक दृष्टिकोनातून पूर्ण केले आहे. आपले आदर्श विचार आत्मसात करण्याचा मी लहानपणापासून नेहमीच प्रयत्न केला आहे आणि बहुतेक वेळा त्यास छान यशही संपादन झालेले आहे. 🌼🟥🛑🟢🟡🌼🌼या सर्व गोष्टींचे श्रेय जाते ते आपणास. कारण, आपली आधुनिक विचारसरणी एखाद्याच्या आयुष्याला चांगली कलाटणी देणारी आणि विकसित मार्गकडे नेणारी नक्कीच आहे. त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे फारच कमी आहेत म्हणून मी आपणास एकच गोष्ट बोलू शकतो ते म्हणजे की माझ्या जीवनात मी आपला निरंतर ऋणी असेन.

💠🟡🟩🟨आपण या भारत देशातील पहिल्या महिला मराठी मुख्याध्यापिका, शिक्षिका, आणि थोर समाजसुधारक आहात. आपल्याचमुळे गरीब लोकांनाही शिक्षण घेण्यास मिळाले. आपणच आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात आपले पती महात्मा जोतीराव फुले यांच्यासह मोठी कामगिरी बजावली. तसेच आपण मराठीतील पहिल्या कवयित्री असण्याचा मान मिळवला आहे. आपल्या नायगाव या गावावर एक प्रसिद्ध कविता आपण लिहिली आहे, तसेच स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला आहे. आपण विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला ज्याची नोंद भारताच्या इतिहासात झालेली आहे. आपल्या या योगदानाला खरंच सलाम.

🟡🛑🌀🌼आपले कर्तृत्व एवढे महान आहे, की ते सांगण्यास वेळ कमी पडेल सोबतच आपले कौतुक करण्यास शब्दही नक्कीच अपुरे पडतील. आपण फुले दाम्पत्य हे दोघेही शिक्षण चळवळीचे खरे जनक आहात. आपल्याचमुळे शिक्षण क्षेत्राला महत्व प्राप्त झाले आणि संपूर्ण भारतात त्याचे परिवर्तन करण्यात आले. आपल्या या महान व्यक्तीमत्वाला भारतातील थोर समाज सुधारक म्हणून सुद्धा संबोधिले जातात. आपल्या मोलाच्या योगदानाने भारत देशाला खूपच चांगले विद्यार्थी आणि आदर्श व्यक्तिमत्व मिळालेले आहेत. 🛑🟨🟩💠आपल्यामुळे स्त्री-शिक्षणाला फार महत्व प्राप्त झाले. कारण पूर्वीच्याकाळी स्त्रियांना मुल आणि चूल एवढेच माहित होते. पण आपल्यामुळेचं त्या सर्व स्त्रियांना आज त्यांची वयक्तिक खरी ओळख मिळालेली आहे. आपण स्त्री-शिक्षणासाठी पुढाकार घेऊन खूप साऱ्या अशिक्षित स्त्रियांना शिक्षण देऊन शिक्षित केले आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यास त्यांना भक्कम आधार दिला आहे त्याबद्दल सर्व भारत देशवासियांच्या मनात आपल्यासाठी एक राखीव जागा नक्कीच असणार आहे.

💠🛑🌼☀️आम्ही सर्व भारत देशवासी खरंच खूप धन्य आहोत कारण आपला अनमोल सहवास या भारतभूमीला लाभला. आपल्यामुळेच आज भारताला सर्वोच्च पुरुषप्रधान व्यक्तिमत्व लाभले त्यापैकी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, विश्वनाथन आनंद, कपिल देव, नारायण मूर्ती, सुंदर पिचाई, रतन टाटा, इत्यादी. तसेच आपल्यामुळे भारत देशात खूप चांगले स्त्री-व्यक्तिमत्व सुद्धा उदयास आलेत त्यापैकी काही विशेष व्यक्तिमत्व म्हणजेच इंदिरा गांधी, कल्पना चावला, लता मंगेशकर, किरण बेदी, मेधा पाटकर, पी. टी. उषा, हिमा दास, विना पाटील, मिताली राज, माधुरी दीक्षित, झुम्पा लाहिरी, इंद्रा नूयी, बचेंद्री पाल, इत्यादी. भारताच्या या सर्वोच्च स्त्रियांनी भारतातच नव्हे तर जगात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची एक अनोखी ओळख निर्माण केली आणि जगालाही पटवून दिले की स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतात. भारताच्या या सर्वोच्च स्त्रीला माझा सलाम तसेच आपल्या एकमेव महान व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा. शेवटी, आपल्यासाठी माझी एक खास पंचाक्षरी काव्यरचना (चारोळी) समर्पित करत आहे.

स्त्रीही शिकली
उच्च ठरली,
भारतीयांची
शान वाढली.!
आपला लेक,
भूषण सहदेव तांबे🌼🌼🌼🌼🌼संकलन किरण घाटे🌼

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here