मॅजिक बस संस्थेच्या वतीने “विद्यार्थ्यांसाठी हिवाळी शिबिराचे” आयोजन
मॅजिक बस संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर संस्थेच्या वतीने मूल तालुक्यात “SCALE” कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास” हा कार्यक्रम मागील वर्षा पासून अविरतपणे राबविला जात आहे.
त्याच अनुषंगाने दिनांक १५ डिसेंबर २०२० पासून विद्यार्थ्यांसाठी हिवाळी शिबिराचे आयोजन केल्या गेले. मूल तालुक्यातील मूल शहर, मारोडा, कोसंबी, भादुर्णी, हळदी, ताडाळा, राजोली , बेंबाळ, मरेगाव, मोरवाही, सुशी, भेजगाव, केळझर, येरगाव, चांदापूर, भवराळा, डोंगरगाव इत्यादी गावांमध्ये “हिवाळी शिबिराचे” आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी पोस्टर प्रदर्शनी, चित्रकला, सांघिक खेळ इत्यादी गोष्टी राबविण्यात आल्या. ज्यामाध्यमातून कोरोना बाबत जागृती करण्यात आली व त्या सोबतच संवाद कौशल्य, गटकार्य, समस्याची सोडवणूक इत्यादी जीवन कौशल्यांवर शाळा सहाय्यक अधिकारी संदेश रामटेके, शुभांगी रामगोनवार, दिनेश कामतवार, आकाश गेडाम व प्रत्येक गावातील समुदाय समन्वयकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
