फवारणी व जनजागृतीच्या माध्यमातून डेंगूच्या प्रकोपावर नियंत्रण आणा – आ. किशोर जोरगेवार

0
475

फवारणी व जनजागृतीच्या माध्यमातून डेंगूच्या प्रकोपावर नियंत्रण आणा – आ. किशोर जोरगेवार

 

शहरातील अनेक भागात डेंगुने डोके उंचावले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामूळे मनपा प्रशासनाने योग्य नियोजन करुन फवारणी व जनजागृतीच्या माध्यमातून डेंगुचा प्रकोर नियंत्रित करण्यासाठी युध्द स्तरावर काम करावे अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना दिल्या आहे.

 

शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेत डेंगू बाबतच्या उपाययोजनांसह शहरातील विकास कामांबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी मनपा आयुक्त यांना सदर सूचना केल्यात. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे पंकज गुप्ता, युवा नेते अमोल शेंडे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, सायली येरणे, विश्वजीत शाहा, राशिद हुसेन, स्मिता दंराडे, रुपेश झाडे, गौरव जोरगेवार आदिंची उपस्थिती होती.

 

शहरातील अनेक भागात डेंगूने हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. असे असले तरी सदर भागात योग्यरित्या किटकनाशक फवारणी व फाॅगींग केल्या जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यातच वायरल तापाची साथ सुरु आहे. त्यामूळे वायरल ताप समजून डेंगूच्या तापाकडे दूर्लक्ष केल्या जात आहे. ही बाब लक्षात घेता डेंगूच्या लक्षणासह त्यातून बचाव करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, तसेच डेंगुच्या प्रकोप असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात जंतूनाशक फवारणी व फाॅंगींग करण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी या बैठकीत मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना दिल्या आहे. सोबतच जटपूरा गेट येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, लसीचे योग्य नियोजन करुन इंदिरानगर येथील लसीकरण केंद्रावर मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करावी, भुमिगत विजवाहक तार जाणा-या जागेवर पेवर ब्लाॅक टाइल्स लावण्यात यावी, स्थानिक विकास निधी व खनिज निधी अंतर्गत मंजूर पाणिपूरवठ्याची कामे तात्काळ सुरु करण्यात यावी, शहरात मुबलक पाणी पूरवठा करण्यात यावा, रेहमत नगर येथील नाल्याची समस्या सोडविण्यात यावी, व्यायमशाळा विकास व क्रिडांगण विकास योजने अंतर्गत कामांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिका-यांकडे तात्काळ सादर करण्यात यावे आदी सूचना यावेळी आमदार किशोर जारगेवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना केल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here