अध्यक्षपदी श्रीकृष्ण गोरे तर सचिव पदी एजाज अहमद यांची निवड

0
327

अध्यक्षपदी श्रीकृष्ण गोरे तर सचिव पदी एजाज अहमद यांची निवड

राजुरा पत्रकार असोसिएशनची नवीन कार्यकारणी गठित ; उपाध्यक्ष संतोष कुंदोजवार, प्रा. प्रफुल शेंडे यांची निवड

राजुरा : राजुरा पत्रकार असोसिएशन राजुराच्या कार्यकारणीचा तीन वर्षाचा कार्यकाल संपल्याने नविन कार्यकारणीची निवड करण्यासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यात अध्यक्षपदी श्रीकृष्ण गोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिव पदी एजाज अहमद यांची निवड करण्यात आली.

राजुरा पत्रकार असोसिएशनच्या कार्यकारणीचा कार्यकाल संपल्याने नविन कार्यकारणीची निवड करण्यासाठी नुकतीच शासकीय विश्रामगृह राजुरा येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे बिनविरोध निवडणूक घेण्यात आली यात अध्यक्षपदासाठी श्रीकृष्ण गोरे यांचे सर्वानुमते नाव समोर आल्याने त्यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिव एजाज अहमद, कार्याध्यक्ष मंगेश बोरकुटे, उपाध्यक्ष संतोष कुंदोजवार, प्रा. प्रफुल शेंडे, कोषाध्यक्ष सय्यद जाकीर, सहसचिव साहील सोळंके तर कार्यकारणी सदस्य म्हणून वसंत पोटे, मनोज आत्राम, फारुख शेख, शहनवाज कुरेशी, अमीत जयपूरकर, सागर भटपल्लीवार, उमेश मारशेट्टीवार, मंगेश श्रीराम, बंडू वनकर, प्रकाश काळे, प्रेस फोटोग्राफर अविनाश दोरखंडे यांची निवड करण्यात आली. नविन कार्यकारणीच्या निवडीबद्दल शहरातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here