प्रहार कार्यकर्त्याची बैठक चंद्रपूरात संपन्न !

0
570

प्रहार कार्यकर्त्याची बैठक चंद्रपूरात संपन्न ! 🟡🟣 चंद्रपूर 🟣🟡किरण घाटे 🟡🟣आज शनिवार दि.१६जानेवारीला ना.राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या एका आदेशान्वये पूर्व विदर्भ प्रमुख तथा चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख गजाननभाऊ कुबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्वपूर्ण कार्यकर्ता बैठक शासकीय विश्रामगृह चंद्रपुर येथे पार पडली 🟡🟣💠🟢दरम्यान या पार पडलेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.अमोल बावने व प्रफुल चवरे यांनी जाहिररित्या प्रहार जन पक्षात प्रवेश केला.
🟣🟢🛑अनेक नागरिकांनी गजुभाऊ कुबडे यांना विविध समस्यांचे लेखी निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी या वेळी केली.
🟣🟢💠🟡🛑चंद्रपुर जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्ष जोमाने वाढवा असा आदेश देत गजुभाऊ कुबडे यांनी ! गाव तिथं शाखा ! स्थापन करण्याचे आवाहन प्रहारसेवकांना या बैठकीत केले.
🛑🟢💠🟩लवकरच राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडु यांचा कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी खुला जनता दरबार आयाेजित करणार असल्याचेही गजुभाऊ कुबडे यांनी या वेळी सांगितले .
जिल्ह्याभरातून प्रहारसेवक या बैठकीला माेठ्या संख्येने हजर हाेते. 🔶🟣🟡💠या शिवाय आयोजित कार्यकर्ता बैठकीला महेश हजारे, नितीन कुमरे , श्यामुल पानवल, अण्णासाहेब हजारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here