घुग्घुस येथील जनता कॉन्व्हेंट स्कुल मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

0
214

घुग्घुस येथील जनता कॉन्व्हेंट स्कुल मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

दि.३ जानेवारी २०२४ बुधवार रोजी जनता कॉन्व्हेंन्ट स्कुल घुग्घुस येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सोबत माता सरस्वती, महात्मा जोतिबा फुले व संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी श्रीहरी जिवतोडे गुरुजी, मातोश्री लिलाताई जिवतोडे यांचा प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ज्यांना ओळखले जाते व पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जनता कॉन्व्हेंट स्कुल घुग्घुस येथे भव्य प्रमाणात साजरी केली गेली. कार्यक्रमात विध्यार्थी, पालक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपने सहभाग घेतला. चिमुकल्या मुलांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्यासारखी वेशभूषा तथा चिमुकल्या मुलींनी सावित्रीबाई बनून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक इयत्तेतून एक एक सामूहिक नृत्य तथा एक समूह नाट्य प्रस्तुत केले गेले. प्रत्येक मुलींनी सावित्रीबाई सारखे इतिहास घडवावे असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या प्राचार्या सविता येरगुडे मॅडमने केले. प्रमुख पाहुणे म्हणून जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विठोबा पोले आपल्या भाषणात म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या परिश्रमाणे आज महिलांना उंच भरारी घेण्यास स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचा फायदा सर्वा मुलींनी व महिलांनी घ्यायला पाहिजे.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका किर्ती खैरे व प्रास्ताविक शिक्षिका स्वाती बुच्चे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार शिक्षिका सुनंदा बावणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षिका ज्योती कांबळे, मीनाक्षी गिरडकर, शिवानी पुणघंटी, प्रणाली बोबडे, धनलक्ष्मी पांडे, सुजाता पाटील, प्रियंका सुरजुसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here