इंदापूर मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार गारांचा पाऊस

0
649

तालुका प्रतिनिधी/इंदापूर .✍🏻तेजस हेगडे

 

पुणे (इंदापूर) :- आज इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी, वरकुटे खुर्द ,गोतोंडी,रामकुंड या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. निमगाव केतकी मध्ये गारा व सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. निमगाव गोतोंडी दरम्यान वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे झाडे उन्मळून पडली त्यामुळे बारामती इंदापूर रोड पूर्णपणे गोतंडी निमगाव नजीक बंद झाला आहे. बळीराजा च नुकसान खुप झाल आहे.इंदापूर मध्ये आज अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे.हवामान खात्यानं आधीच या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.

या अवकाळी पावसात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच संकटात असलेल्या बळीराजा ला अवकाळी पावसानं पुन्हा अडचणीत आणलं आहे. हवामान विभागानं राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना, व विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. असं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here