वारीचा एक अभिनव उपक्रम “एक पाऊल प्लॅस्टिकमुक्त शहराकडे” 

0
534

विशेष प्रतिनिधी/✍🏻किरण घाटे

चंद्रपूर : आज सर्वत्र सर्रासपणे पॉलिथिनच्या पिशव्यांचा वापर केल्या जात आहे. बाजारातून साधी फळे असो कि भाजीपाला असाे त्यासाठी सरसकट पॉलिथिनची पिशवीच वापरली जात असल्याचे चित्र द्रूष्टीक्षेपात पडु लागले आहे. अगदी स्वस्त व सहज उपलब्ध होत असलेल्या या पिशव्या पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय धोकादायक व हाणीकारक आहेत हे माहीत असुन सुध्दा लोकं त्यांचा वापर करीत आहे .

हे खरे वास्तव आहे. जेव्हा घरापुढील नाल्या आणि गटारी तुंबल्या जातात , प्लॅस्टिक जाळल्यावर असह्य होणा-या वासाने बेचैन झाल्या सारखे वाटते .इकतेच नाही तर गोमातेच्या पोटातून जेव्हा २० ते २५ किलो प्लॅस्टिकचा कचरा काढतानांचे द्रूष्य बघतो तेव्हा कुठे थोडीफार आपणांस संवेदनशीलता वाटायाला लागते.

मात्र तो क्षण निघुन गेल्यावर स्वतःला सुजाण नागरिक म्हणून घेणारे आम्ही जैसे थे वागायला लागतो. प्लॅस्टिक हे आपल्या शहरासाठी, देशाकरिताच नव्हे तर संपुर्ण जगासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. या ना त्या प्रकारे प्लॅस्टिक मानवी अन्नसाखळीत देखील प्रवेश करीत आहे. शहरातील डंम्पींग यार्डला भेट दिली असता सहन करावा लागणारी घुटमळ, तेथील नागरिक ,वाटसरू दररोज कसॆ सहन करीत असतील याची फार चिंता वाटते. सागरात निर्माण झालेल्या प्लॅस्टिकच्या अख्ख्या खंडामूळे तर तेथील जलचरांचे मरण किती जवळ आलेले आहे, याचा विचार देखील करायला आपल्याकडे वेळ नाही.

या सर्व बाबींचा विचार करून वारी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने खास पर्यावरण प्रेमी नागरिकांसाठी शनिवार, दि.५जून २०२१ला ऑनलाईन प्रसार माध्यमांव्दारे प्लॅस्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि उपाययोजना या विषयी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. विश्व पर्यावरण दिवसाच्या निमीत्ताने आयोजित या कार्यक्रमात सुपरिचित पर्यावरणवादी इंजिनिअर मिलिंद पगारे यांचे मुख्य मार्गदर्शन याप्रसंगी लाभणार आहे.संस्थेच्या waree sanstha या युट्यूब चॅनेल वर दुपारी ठिक ४:३० वाजता होणा-या थेट प्रक्षेपणात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजय खनके, उपाध्यक्ष नितेश उरवेते, सचिव प्रियंका वैरागडे यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सदस्य गणेश पोहाणे, नरेंद्र मोगरे, भारत लाकडे, चंदा येरणे, स्नेहल अंबागडे, सोनाली पोहाणे सुचिता येनूरकर व मयूरी बालपांडे आपापल्या परिसरातील नागरिकांना ऑनलाईन होणा-या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here