भीमा कोरेगाव शौर्य दिन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य तालुका स्तरीय वैयक्तिक डान्स स्पर्धेचे गोवरी येथे आयोजन

0
652

भीमा कोरेगाव शौर्य दिन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य तालुका स्तरीय वैयक्तिक डान्स स्पर्धेचे गोवरी येथे आयोजन

राजुरा : नवीन वर्षाच्या शुभ पर्वावर खास बुद्ध विहाराच्या सर्वांगीण विकासाकरिता भीमा कोरेगाव शौर्यदिन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य तालुका स्तरीय वैयक्तिक डान्स स्पर्धेचे आयोजन राजुरा तालुक्यातील तक्षशिला बुद्धविहार परिसर गोवरी येथे 3 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

या तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत अ गटात 3 ये 12 वर्ष, ब गटात 13 ते 17 वर्ष आणि क गटात 18 ते पुढील वयोगटातील स्पर्धकांना वयक्तिक नृत्यासाठी सहभागी होता येणार असून तिनही गटाकरिता प्रति गट प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये व तृतीय 2 हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता इच्छुक स्पर्धकांनी प्रा. दिनेश घागरगुंडे 8975652418, सिद्धार्थ कास्वटे 8605866846, प्रमोद पडवेकर 9923104866, राहुल भगत 9021898960, संदीप कास्वटे 9764088244 या क्रमांकावर संपर्क करून सहभाग नोंदविता येणार आहे. प्रत्येक विजेत्या स्पर्धकाला बल्लारपूरचे चंद्रप्रकाश नळे यांच्याकडून आकर्षक सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.

याकरिता जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संबुद्ध पंचशील युवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिनेश घागरगुंडे तसेच रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा आयु. अनिता कास्वटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here