आदर्श हायस्कुल येथे राष्ट्रीय बालिका दिन साजरा

0
460

आदर्श हायस्कुल येथे राष्ट्रीय बालिका दिन साजरा

विध्यार्थीनी घोषवाक्य व विविध संदेशाद्वारे केली जनजागृती

 

राजुरा 24 जाने.
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब) च्या वतीने राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. वनसंरक्षक सामाजिक वनीकरण नागपूर यांचे कार्यालय पत्रान्वये सामाजिक वनीकरण विभाग कार्यालय राजुरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, वनपाल विलास कुंदोजवार यांच्या मार्गदर्शनात आदर्श शाळेचे राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय बालिका दिन निमित्त विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य व संदेशात्मक बोर्ड तयार करून राष्ट्रीय बालिका दिनाचे महत्व सांगून जनजागृती केली. यावेळी राष्ट्रीय हरीत सेनेचे निवडक विध्यार्थी सहभागी झाले. “अगर बेटा वारस है, तो बेटी पारस है.”, she can do anything, “कैसे खाओगे उनके हात की रोटीया, जब पैदा ही नही होने दोगे बेटीया”, she is our pride, has always been always be, “बेटी को जो दे शिक्षा और पहचान, वही माता -पिता है महान.”, “बेटी बचाओ, बेटी पढाओ.”, असे विविध घोषवाक्य तयार करण्यात आले. आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यपिका नलिनी पिंगे यांनी विध्यार्थीना मार्गदर्शन केले. उपक्रमाचे सूत्रसंचालन कु. सरिता लोहबडे या विध्यार्थ्यांनी केले. आभार कु. सावी येसेकर या विध्यार्थीने मानले. उपक्रमाच्या यशस्वीते करिता राष्ट्रीय हरीत सेना (इको क्लब) च्या विध्यार्थीनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here