राजुरा येथे पंजाब सरकारचा निषेध

0
430

राजुरा येथे पंजाब सरकारचा निषेध

निमकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन

 

राजुरा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या पंजाब दौऱ्यात राज्य सरकार कडून अक्षम्य हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याप्रकरणी पंजाब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत (दि. ८) राजुरा तालुका व शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यां तर्फे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रपती यांना राजुरा चे तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्फतीने निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी भाजपा चे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे, जिल्हाउपाध्यक्ष सतीश धोटे, तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, वाघुजी गेडाम, माजी नगरसेवक राजू डोहे, खामोना ग्राम पंचायतीचे सरपंच हरिदास झाडे, मधुकर नरड, भाजयुमो अध्यक्ष सचिन शेंडे, मंगेश श्रीराम, श्रीनू पांजा, राजकुमार भोगावार सह सर्व आघाड्यांचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते, यावेळी पंतप्रधान यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा निषेध करून नारेबाजी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here