गुन्हे शोध पथक बरखास्त करून त्या अंमलदारांना मुख्यालयी सलग्न करा

0
486

गुन्हे शोध पथक बरखास्त करून त्या अंमलदारांना मुख्यालयी सलग्न करा

राजुरा विधानसभा युवक काँग्रेसची मागणी; गुन्हेगारी, चोरीला शहरात सुगीचे दिवस

 

राजुरा : तालुक्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून किरकोळ गुन्ह्यासह मोठ्या गुन्ह्यांत ही लक्षणीय वाढ होत आहे. चोरी, छेडछाड, मारपीठ, धमकी यांसारखे प्रमाण अधिक आहे. राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे शोध पथकात (डी.बी.) कार्यरत काही अंमलदारांकडून गुन्हेगार व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींशी संबंध ठेवून अनेक गुन्हे अफरातफर केले जात आहे. या पथकातील अंमलदारांबदल विविध संघटना व पक्षांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या आहे. मात्र यावर कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने राजुरा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र यांना निवेदनातून राजुरा पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथक (डी .बी.) बरखास्त करून मुख्यालयी संलग्न करण्याची मागणी केली आहे.
राजुरा येथे कार्यरत पो. हवालदार रवी नक्कावार व इतर हवालदार कर्मचारी यांच्याबद्दल अनेक तक्रारी स्थानिक स्तरावरून करण्यात आल्या मात्र तक्रारी पोलीस निरीक्षक व पोलीस अधीक्षक गांभीर्याने घेत नाही. काही दिवसांपूर्वीच गुन्हे शोध पथकातील काही अंमलदारांकडून वाहन चोरी प्रकरणात बनावट मौका पंचनामा केल्याचे वृत्तपत्रात वृत्त छापून आले होते. याबाबत विभागाकडून थातूरमातूर चौकशी करून संबंधीत अंमलदारांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

सद्या राजुरा शहरात गुन्हे शोध पथक (डी.बी.) च्या संगनमताने अनेक गैरधंदे जोमात सुरू आहे. वेकोली परिसरात चोरट्यांना (डी बी) गुन्हे शोध पथकाकडून खुली सूट दिल्या गेल्याची चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात असून, बल्लारपूर परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना राजूरा परिसरात आमंत्रित केले जात असून दिवसा गणिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काही अमलदारांनी तर चोरट्यांशी हात मिळवणी करून अर्थपूर्ण व्यवहार करीत आहे. या सर्वांमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असून राजुरा पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथक (डी.बी.) बरखास्त करून तेथील अंमलदारांना मुख्यालयी सलग्न करण्यात यावे, अन्यथा युवक काँग्रेस कडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. परिस्थिती चिघळल्यास यास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष एजाज अहमद यांनी निवेदनातून सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here