महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यास आम्ही तयार – ऍड. सुनीता मनोहर पाटील

0
315

महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यास आम्ही तयार – ऍड. सुनीता मनोहर पाटील

दिनांक 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टी महानगर तर्फे नेहरू कॉलेज समोर, घुटकाळा वॉर्ड स्थित पार्टी ऑफिस येथे महिला अध्यक्षा ऍड सुनीता पाटील यांचा नेतृत्वात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

महिला सशक्तीकरण अंतर्गत कराटे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवत आपले बचाव कश्या पद्धतीने करता येईल सांगितले. सोबतच आंतराष्ट्रीय ग्राफ्टिंग शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला. या कार्यक्रमात गरिबीतून आपले जीवन जगत सामोरे कसे जात आहे लढा कश्या पध्दतीने देत आहे सांगत सर्वांचे मनोबल वाढवले. या कार्यक्रमात आप बल्लारपूर महिला संघटना सुद्धा सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.

या कार्यक्रमाला जिल्ह्याचे संघटन मंत्री श्री नागेश्वर गंडलेवार, बल्लारपूर शहराध्यक्ष रवी पप्पुलवार, जास्मिन शेख, काटकर, मीनाताई पोटफोडे वंदना कुंदावार, शबनम शेख, सुहास रामटेके, सुहानी दुर्योधन, संतोषी यादव, सुभद्रा मुन, पुष्पा बुधवारे, माया दुपारे, नमिता पाटील, साधना पाटील, प्रणाली पाटील, बेबीबाई मुगले, कल्पना शिरसागर, ज्योती संगेवार, देवकाबाई इंगळे, सुंदराबाई पोटफोडे, ज्योतीताई बाबरे, सलमा सिद्दिकी,किरण खन्ना, आलीना शेख, शिरीन सिद्दिकी, बेबीताई बुरडकर, व इतर असंख्य महिला उपस्थित होते. सर्व महिलांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here