पाणी टंचाई निर्माण होणार नाही या बाबतीत याेग्य नियोजन करा -आ. किशोर जोरगेवार

0
498

पाणी टंचाई निर्माण होणार नाही या बाबतीत याेग्य नियोजन करा -आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर🟤किरण घाटे । इरई धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही दर उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो हा आजवरचा वाईट अनुभव राहिला आहे. आता हि परिस्थिती बदलविण्याची गरज आहे. नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी देणे ही मनपाची जबाबदारी आहे. त्यामूळे यंदाच्या उन्हाळ्यात चंद्रपूर शहरातील कोणत्याही भागात पाणी टंचाई निर्माण होणार नाही या दिशेने उत्तम नियोजन करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना दिले आहे.
पाणी प्रश्नासह शहरातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आज गुरुवारी महानगर पालिका अधिका-यांसह आमदार जोरगेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात बैठक घेत महत्वाच्या सुचना केल्यात. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता महाराष्ट्र जिवन प्राधिकरण भालाधारे, शाखा अभियंता महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विवेक ताम्हन, उप अभियंता विजय बोरीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंदारे आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक घरी मुबलक प्रमाणात पाणी पोहचेल याचे नियोजन मनपा अधिका-यांनी करावे असे निर्देश सदर बैठकीत आ. जोरगेवार यांनी दिले आहे. अमृत कलश योजनेचे काम कासव गतीने सुरु आहे. यावरही आमदार किशोर जोरगेवार यांनी असमाधान व्यक्त करत हे काम जलदगतीने पूर्ण करावे तसेच या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात यावी, पाणी टंचाईग्रस्त भागात पाणी पूरवठा करण्यासंदर्भात योग्य उपायोजना करण्यात याव्यात अशा सूचना केल्या आहे. चंद्रपूरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याकरीता मनपाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, जानेवारी 2021 पासून बंद करण्यात आलेला आशावर्कर यांचा कोरोना कालावधीतील वाढीव भत्ता सुरु करण्यात यावा, प्रधानमंत्री आवाज योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात यावा आदि सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here