शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी जिल्हा परिषद सदस्य पेचे : तहसीलदारांना दिले निवेदन

0
479

शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी

जिल्हा परिषद सदस्य पेचे : तहसीलदारांना दिले निवेदन

(कोरपना),प्रवीण मेश्राम तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली. यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कल्पना पेचे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदारांना दिले आहे.
कोरपना तालुक्यात मागील आठवड्यात ४८ तासांत २०० मीमीवर पाऊस पडला. या पावसाने तालुक्यातील पकड्डीगडम व अमलनाला सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरून ओसांडुन वाहात आहे. दुसरीकडे नदी, नाल्यालगत असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पाऊसाचे पाणी घरात शिरले. अनेक घरांची अंशतः पडझड झाली आहे. तालुक्यात यंदा जून महिन्यातच चांगला पाऊस पडला. याचदरम्यान शेतकऱ्यांनी
बँक, खासगी कर्ज घेऊन आपल्या शेतात बियाणे पेरलीत. बियाणे ही चांगल्या पध्दतीने उगवले. पन्हाटी, सोयाबीनला खते, निंदन, खुरपन केले. ग्रामीण भागात मजूर मिळत नाही. दुसरीकडून मजूर आणून शेतीकामे करण्यात आली. अशातच तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली. ग्रामीण व शहरी भागातील नदी, नाल्या काठावरील शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पावसाने
खरवडून नेली. तिकडे शेतीचे तर इकडे घराचे नुकसान झाल्याने शेतकरी व शेतमजूर हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई पेचे, उतमराव पेचे, भाऊराव चव्हाण, सुदर्शन डवरे, अरुण गोहकर, देवराव सोयामस यांनी केली आहे. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री ठाकरे, पालकमंत्री वडेट्टीवार, आमदार धोटे यांना निवेदन पाठविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here