बोरगाव बुट्टी ते सिरसपूर शिवरा रोडची त्वरित उपाययोजना करा शुभम मंडपे यांची मागणी

0
439

बोरगाव बुट्टी ते सिरसपूर शिवरा रोडची त्वरित उपाययोजना करा शुभम मंडपे यांची मागणी

सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

बोरगाव बुट्टी ते सीरपूर शिवरा रोडवर खूप मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत व या गड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुडे आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी बोरगाव बुट्टी ते सिरसपूर शिवरा या मार्गाची त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे व सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला आहे

ह्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे व हे रास्तावरील गड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत या रस्ताने बोरगाव बुट्टी व शिवरा सिरसपूर येथील शेतकरी व शेतमजूर व अन्य प्रवासी जात असतात मात्र या रसत्याकडे स्थानिक प्रशासनाचे व सर्वांजिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे तरी बोरगाव बुट्टी व सिरसपूर शिवरा रस्त्याची त्वरित उपपयोजना करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमुर येथे देण्यात आले यावेळी आंबोली ग्रामपंचायत सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे , सामाजिक कार्यकर्ते मधुकर नागपुरे , सत्यवान नगराळे , रोहित गेडाम व सम्यक चे पदाधिकारी उपस्थित होते व बोरगाव बुट्टी येथील शेतकरी शुभम वाघमारे व सुमित गायकवाड उपस्तीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here