विरुर वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या लक्कडकोट नियतक्षेत्रात नरभक्षक बिबट जेरबंद

301

विरुर वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या लक्कडकोट नियतक्षेत्रात नरभक्षक बिबट जेरबंद

दीड महिन्यापासून जेरबंद करण्याची सुरू होती मोहीम

राजुरा : दीड महिन्यांपूर्वी राजुरा तालुक्यातील लक्कलकोट येथील एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केलेल्या बिबटला अखेर आज दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी सहाचे दरम्यान जेरबंद करण्यात वनविभागास यश आले आहे.

मध्य चांदा वन विभागाच्या विरुर वनपरिक्षेत्र अंतर्गत लक्कडकोट वनक्षेत्रात दीड महिन्यापूर्वी बिबटचा धुमाकूळ सुरू होता. सुब्बई जवळील तुम्मागुडा येथील व लक्कडकोट येथील एक अशा दोन शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केले होते. शिवाय काही बकऱ्या फस्त केल्या होत्या. त्यामुळे वनकर्मचारी त्या बिबटला जेरबंद करण्यासाठी रात्रंदिवस मोहीम सुरू केली होती. अखेर आज दिनांक 18 जानेवारी रोजी लक्कडकोट नियतक्षेत्राचे कक्ष क्रमांक 48 मध्ये ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद झाला याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार यांनी वरिष्ठ वनाधिकार्याना दिली व मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यवाई करून आणि वैद्यकीय तपासणी करून चंद्रपूरला हलविण्यात आले.

ही मोहीम उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार, क्षेत्र सहायक मनोहर गोरे, शेख, सुरेश मांदाडे, रवी वैद्य, सुमेध शिंदे, प्रिया लांडगे, नरेश लाडसे, तसेच पी आर टि चे पथक, कोष्टळा कॅम्प मधील वनमजुर, देवाडा, सिद्धेशवर येथील वनपाल वनरक्षक यांनी यशस्वी पणे राबविली. हा बिबट जेरबंद झाल्याने वनकर्मचारी सोबतच जनतेनेही सुटकेचा निश्वास सोडला.

advt