नगर परिषद विरोधात दोन दिवसीय लाक्षणिक उपोषण रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे आंदोलन

0
108

नगर परिषद विरोधात दोन दिवसीय लाक्षणिक उपोषण
रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे आंदोलन

चिमूर : नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १० काग येथील विविध न्याय मागण्या करीता नगर परिषद विरोधात १९ फेब्रुवारी रोज सोमवारला सकाळी ११.०० वाजेपासुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच रोखठोक प्रहार कामगार संघटना चिमूर तालुकाध्यक्ष अशिद मेश्राम यांचे नेतृत्वात दोन दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
काग येथील स्मशान भुमी रस्ता व शेड बांधकाम करावा, फुटलेला कोल्हापूरी बंधारा बांधावा,घरकुल योजनेचा थकीत निधी बँकेत जमा करावा,नाल्यांचा गाळ उपसा करून किटक नाशकाची फवारणी करावी,गावातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी,काग येथे पिण्याच्या पाण्यासाठी नविन टाकीचे बांधकाम त्वरीत करावे,पथ दिवे लावावे,पाणी पुरवठा विहिरीतील गाळ उपसा करावा इत्यादी मागण्या करीता गावकऱ्यांच्या वतीने रोखठोक प्रहार कामगार संघटना तालुका चिमूर तर्फे अनेकदा नगर परिषद,जिल्हाधिकारी तथा प्रशासणास निवेदने देण्यात आली.मात्र याकडे नगर परिषद तथा प्रशासणाने जाणीव पुर्वक दुर्लक्षच केले आहे.त्यामुळे शिव जंयती पासुन आंदोलनाचे शस्त्र उगारण्याचे ठरविण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून दोन दिवसीय लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात आली.दोन दिवसात प्रशासणाची झोप न उघडल्यास तिसऱ्या दिवसा पासुन गनिमी काव्याने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष अशिद मेश्राम यांनी दिला. लाक्षणिक उपोषणाला अशिद मेश्राम यांचे सह नानाजी मेश्राम, सुरेश परचाके,हरिचंद्र धोंगडे,प्रभुदास मेश्राम,प्रविण मेश्राम, अमोल धोंगडे,सुभाष रामटेके,पुरुषोतम मत्ते,विनोद गजभिये, किशोर मसराम,अरविंद नैताम,राजु गुडधे,श्रीकृष्ण रामटेके, प्रबुद्ध मेश्राम इत्यादी कागवासी सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here