‘जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद’ माझ्या यशाचे फळ – आमदार बंटी भांगडीया

0
416

‘जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद’ माझ्या यशाचे फळ – आमदार बंटी भांगडीया

जेष्ठ नागरिक संवाद कार्यक्रम संपन्न

वयोवृद्ध नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या

चिमूर/तालुका प्रतिनिधी
राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना सातत्याने वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिला असल्याने सतत यश प्राप्त होत गेले. परंतु वयोवृद्ध नागरिकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्यावर तात्काळ जेष्ठ नागरिक संवाद सत्रामधून त्यांच्या समस्या जाणून तात्काळ सोडविण्याची ग्वाही देत आमदार बंटी भांगडीया म्हणाले की वीज, पाणी मुबलक उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करीत असून येत्या काळात साखर कारखाना निर्माण करून शेतकरी सक्षम व रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नात असल्याचे सांगितले.

 

भाजप जेष्ठ नागरिक आघाडी तालुका चिमूर च्या वतीने आयोजित जेष्ठ नागरिकाना संवाद सत्र कार्यक्रमात आमदार बंटी भांगडीया बोलत होते.

 

यावेळी भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजूरकर, डॉ श्यामजी हटवादे भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे ,भाजप जेष्ठ नागरिक विदर्भ प्रमुख माजी आमदार अरविंद शहापरकर, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार ,माजी जीप उपाध्यक्ष रेखाताई कारेकर माजी पस सदस्य पुडलीक मते, दिलीप नलोडे बाबूजी यंगलवार,बाबूरावजी बोमेवार दिगंबरराव खलोरे , अशोक कामडी आदी उपस्थित होते.

 

सवांद सत्रात जेष्ठ नागरिकांचे प्रश्न, ओबीसी घरकुल , बंधारा, रस्ते व इतर प्रश्न वयोवृद्ध यांनी आपले गावातील प्रश्न मांडले. तेव्हा आमदार बंटी भांगडीया यांनी त्यांचे प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही दिली.संचालन एकनाथ थुटे यांनी केले. प्रास्ताविक तर रमेश कंचर्लावार आभार यांनी व्यक्त केले.

 

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिगंबर खलोरे गुरुजी, अशोकबापू कामडी ,दिलीप नलोडे यांनी परिश्रम घेतले असून समीर राचलवार, भाजयुमो शहर अध्यक्ष बंटी वनकर ,श्रेयश लाखे, अमित जुमडे, महादेव कोकोडे, मनोज सोगलकर गोलू भरडकर, शुभम भोपे यांनी विशेष सहकार्य केले. तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वयोवृध्द जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here