महाराष्ट्रातील दुसरे उच्च शिक्षणासाठीचे बांधिलकी शिबीर बंदर येथे पडले पार

0
92

महाराष्ट्रातील दुसरे उच्च शिक्षणासाठीचे बांधिलकी शिबीर बंदर येथे पडले पार

दि. ११ मार्च
नेचर फाउंडेशन नागपूर च्या वतीने महाराष्ट्रातीलव दुसरे बांधिलकी ८मार्च ते १० मार्च २०२४ ला तीन दिवसीय शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंदर ता. चिमूर जि. चंद्रपूर येथे कोल्हापूर ते चिमूर पासूनच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थित पार पडले.
बांधिलकी एक सामाजिक कर्तव्य या भूमिकेतून दरवर्षी शिबिराचे देशांतील स्वातंत्रप्राप्तीनंतर सुद्धा उच्च शिक्षणातील ग्रामीण भागातील उच्च शिक्षण बद्दल मागासलेपण यावर प्रकाश व मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मार्गदर्शक
एकलव्य इंडिया फाउंडेशन चे समन्वयक मा.कुमार सर (उपजिल्हाधिकारी),निखील मोटघरे (एकलव्य फाउंडेशन समन्वयक) युवराज जीवतोडे (पालक) श्रीकांत एकुडे(चेवनिंग शिष्यवृत्ती लंडन, मुलाखत)सुरज चौधरी(पंतप्रधान युवा संसद महाराष्ट्र सदस्य)शुभम पसारकर (आधार फाउंडेशन) निलेश नन्नावरे (नेचर फाउंडेशन) या सर्वानी लोकशाही, शैक्षणिक वास्तव स्थिति, मनोरुग्ण, आधुनिक कृषी पध्दती यावर मार्गदर्शन केले. सोबत लोकशाही युवा संसद यात आजचा तरुण झोपलेला आहे की नाही यावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली. दिवसाची सुरुवात आनापान करून करण्यात येत होती.
८ मार्च रोजी जि.प.प्राथ.शाळा व नेचर फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पायदळ जंगल सफारी करण्यात आली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावात नक्कि बदल करू असे वचन घेतले.या शिबिराचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ.मंजूषा नन्नावरे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख उपस्थिती आदित्य वासनिक (उपसरपंच) मणी रॉय,आशिष जीवतोडे,अमोल कावरे(नेचर फाउंडेशन)उज्वला कामडी (मुख्याध्यापिका)हे सर्व उपस्थित होते.या नुसार तीन दिवशीय शिबीर पार पडले.

“या बांधिलकी सारख्या शिबीरातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये लोकल टू ग्लोबल आणि ग्लोबल टू लोकल या विचारांची पेरणी निर्माण होऊन भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी शासकीय धोरण निर्मीती मध्ये अग्रेसर होईल असा विश्वास आहे.” – निलेश नन्नावरे (संस्थापक सचिव नेचर फाउंडेशन)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here