शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळण्याकरिता माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले उपोषण.

0
384

 

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळण्याकरिता माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले उपोषण.

हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करण्याची केली मागणी.

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

वर्धा/हिंगणघाट:- 07 सप्टेंबर 2020
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट-समुद्रपूर- सेलु तसेच महाराष्ट्रातील सोयाबीनच्या उभ्या पिकांवर बुरशीजन्य संसर्ग व खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊन निस्तेनाबुत झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५००००/- हजार रुपयाची मदत मिळण्याबाबत तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा या मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्या कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण मांडले व पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले.
यावर्षी खरिपाचा हंगामाला 10 जून पासून सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांनी पेरणीला जोरदार सुरुवात केली सोयाबीनचे पीक सध्या ६० ते ७५ दिवसाच्या दरम्यानचे आहे. मागील ११ ते २२ ऑगस्ट दरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन पिकावर बुरशीजन्य संसर्ग, खोडकिडीचा प्रादुर्भाव पाने खाणारी अळी यामुळे फुले, पात्या,शेंगा 100% गळल्या असून झाड उभे आहे. शेतामध्ये सोयाबीन चे झाड पिवळे पडले असून सुकु लागले आहे.
३० व ३१ जुलैला खूप मोठ्या प्रमाणात धुके पडले त्यामुळे सोयाबीन,कपासीच्या फुले,पात्या, शेंगा रोगामुळे खाली पडल्या. सोयाबीनच्या कोणत्याही झाडाला एकही शेंग राहिले नाही. शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकात जनावरे चारण्यास सोडले असून काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये ट्रॅक्टर द्वारे कल्टीवेटर मारून रब्बी हंगामासाठी शेत तयार करण्यास सुरुवात केली आहे.
अशाप्रकारे सोयाबीन उत्पादक शेतकरी अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत असून दुष्काळाच्या झळा सोसत आहे. दर वर्षी होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे एकरी एक किलो सोयाबीन होणार नाही.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या परिस्थितीतील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याची माहिती भारत सरकारचे माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार साहेब यांना फोनद्वारे संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आहे.
तरी केंद्र व राज्य सरकारने कृषी विभागाची टीम दिल्ली मुंबईवरून पाठवून र्वे करावा आणि शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५००००/- हजार रुपयाची मदत मिळण्याकरिता माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे उपोषण मांडले व पंतप्रधान नरेंद्र मोदी,खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here