इव्हीएम बंदी साठी सर्वोच्च न्यायालयाला मतदारांचे ५० हजार पत्र पाठवणार…

0
92

इव्हीएम बंदी साठी सर्वोच्च न्यायालयाला मतदारांचे ५० हजार पत्र पाठवणार…

पुरोगामी पत्रकार संघाची मतदार जागृती मोहीम 

बल्लारपूर / चंद्रपूर प्रतिनिधी – आगामी लोकसभेच्या निवडणुका एव्हीएम मशीन ने न घेता बायलट पेपर वर घेण्यात याव्यात या मागणी साठी पुरोगामी पत्रकार संघ आणी या संघाच्या संपूर्ण संलग्न शाखा राज्यात मतदार जागृती अभियान राबवून मतदारांचे ५० हजार विनंती पत्र सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पाठवणार आहे.ही मोहीम पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात राबवली जाणार असून या मोहिमेचे नेतृत्व संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अटांगळे पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष संतोष जाधव,राज्य सचिव निलेश ठाकरे, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर, पुरोगामी साहित्य संसद च्या विदर्भ अध्यक्षा तथा पुरोगामी पत्रकार संघाच्या कायदेशीर सल्लागार एड.योगिता रायपुरे, महिला आत्याचार निवारण समितीच्या राज्य अध्यक्ष कल्याणी धोंडगे करणार आहेत.

या मोहिमेत पाठवण्यात येणाऱ्या पत्राचा छापील मजकूर असून यावर मतदारांच्या स्वाक्षरी सह तालुका आणी जिल्ह्याची नोंद असणार आहे.हे पत्र राष्ट्रभाषा हिंदीत राहणार असून पत्राच्या संदर्भात “मतदान करण्याचा सर्वोच्च अधिकार भारतीय संविधानाने दिल्यामुळे माझ्या नागरी अधिकाराला संरक्षण मिळण्या संदर्भात” असा उल्लेख केलेला असेल. पत्राच्या मायण्यात “मी स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक असून,भारतीय लोकशाहीवर माझी प्रचंड निष्ठा आहे. मात्र इव्हीएम मशीनवर मतदान केल्याने मतांची मोठ्या प्रमाणात चोरी होऊन मतदारांना नको असलेल्या उमेदवाराला मते जाऊन तो उमेदवार मतदारांवर लादल्या जात असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. स्वतंत्र भारत देशाचा नागरिक म्हणून मला मिळालेला मतदानाच्या अधिकारावरच घाव घातल्या जात असेल, आणी या इव्हीएम मशीन मुळे माझे गुप्त मतदानच चोरीला जात असेल तर हा प्रकार भारतीय संविधानाने दिलेल्या नागरी अधिकारांचे हनन आहे.” असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पत्राच्या अखेरीस मतदारांचे नागरी अधिकार सुरक्षित आणी आबाधित राखण्याची विनंती सर्वोच्च न्यायाल्याला करण्यात आली आहे. अशी माहिती पुरोगामी साहित्य संसद च्या विदर्भ अध्यक्षा एड. योगिता रायपूरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here