अकोल्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या….

0
383

अकोल्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या….

 

अहमदनगर
संगमनेर 21/12/2021
प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील

 

नगरपालिकेच्या , नगरपंचायत यांचा प्रचार थांबला असून , काल सर्वच राजकीय पक्षांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत, सांगता सभा घेतल्या. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची आघाडी असून , आघाडीतील महत्त्वाचा घटक काँग्रेस वेगळी चूल मांडून निवडणुकीला सामोरे गेले आहेत. तर मनसे तीन ठिकाणी आपले मत अजमवित असून, भाजप ही मैदानात आहे. राष्ट्रवादी व सेना हे सर्वच प्रभागात उमेदवार उभे करून लढा देत आहे तर भाजप ला एका प्रभागात उमेदवारच मिळाला नाही. काँग्रेस पक्ष सात जागांवर नशीब अजमावत आहे.

काल सर्वच राजकीय पक्षांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत सांगता सभा घेतल्या. शिवसेना, व राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजप शासित कर्नाटक राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना बाबत तीव्र निषेध करून महाराजांना दुधाचा अभिषेक केला ,या वेळी मोठी जनता उपस्थित होती. तर सायंकाळी प्रचंड जाहीर सभा झाली.या वेळी आमदार किरण लहामटे, लोकनेते, सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर, राष्ट्रवादी अध्यक्ष भानुदास तिकांडे, प्रकाश मालुंजकर, बाळासाहेब ताजने ,शहर अध्यक्ष संपतराव नाईकवाडी, सेनेचे धुमाळ, नवले, नायकवडी, हासे सह सर्वच उमेदवार उपस्थित होते . भाजप ने मोठ शक्ती प्रदर्शन करत सांगता सभा घेतली . माजी आमदार वैभव पिचड, कैलास वाकचौरे, शिवाजी धुमाळ , जालिंदर वाकचौरे यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपचे अध्यक्ष सीताराम भांगरे यांनी विजयाचा दावा केला असून एक हाती भाजप सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीत लक्ष्मी दर्शन घडू शकते , एका पतपेढी मधून काही पैसे उचले आहेत , मतदारांनी या प्रलोभन ला बळी पडू नये असे आवाहन आमदार किरण लहामटे यांनी केले . तर गायकर यांनी प्रामाणिक राष्ट्रवादी शिवसेना आघाडी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास मच्चींद्र धुमाळ शिवसेना अध्यक्ष यांनी व्यक्त केला.

मतदान प्रक्रिया शांतेत होईल असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला असून, गैर प्रकार झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून , अवशकता वाटली तर जादा कुमक ही तयार आहे. नागरिकांनी अफवा वर विश्वास न ठेवता निर्भिडपणे मतदान करावे असे आवाहन सर्वच राजकीय पक्षांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here