आंबेडकरी चळवळीतील मानाच पान हरपलं : खासदार बाळूभाऊ धानोरकर
माजी आमदार ऍड एकनाथराव साळवे यांच्या निधनाने तळागाळातील कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ, आंबेडकरी चळवळीतील मानाच पान, राजकारण बाजूला सारून समाजकारण यशस्वीपणे रुजवणारा नेता आज आपण गमावलेला आहे. अतिशय हुशार आणि आपल्या कार्याची अमीट छाप सोडणाऱ्या कणखर नेत्याची सावली यापुढे आपल्यासोबत नसल्याचे दुःख व्यक्त करीत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी व्यक्त केल्यात.

चंद्रपुरातील राजकारणातील संत हरपला : प्रतिभाताई धानोरकर
माजी आमदार ऍड एकनाथराव साळवे यांच्या निधनाने एक कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू आणि प्रचंड लोकसंग्रह असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने चंद्रपूरची जनता त्यांना नेहमीच स्मरणात ठेवेल. चंद्रपुरातील राजकारणातील संत हरपला अशा शब्दात भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली.
ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला : रामू तिवारी
पुरोगामी चळवळीचे अग्रणी योद्धा, फुले, शाहू, आंहबेडकरी विचारांचे निष्ठावान प्रचारक, सत्यशोधक विचाराचे प्रखर कार्यकर्ता, लेखक, विचारवंत, काँग्रेसचे माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे यांच्या निधनाने समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांनी व्यक्त केल्या. अॅड. साळवे यांनी जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी समाजाची हानी झाल्याचेही तिवारी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.