घुग्घस-वणी मार्गावर सौंदर्यीकरणासह पथदिवे लागणार

435

घुग्घस-वणी मार्गावर सौंदर्यीकरणासह पथदिवे लागणार

 

 

घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील कबीर पेट्रोल पंप, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बेलोरा पुल, म्हातारदेवी रस्त्यापर्यंत रस्त्यावर पथदिवे लावण्यात येणार आहे. तसेच घुग्घुस शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

कबीर पेट्रोल पंप, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बेलोरा पुल, म्हातारदेवी रस्त्यापर्यंत रस्त्यावर पथदिवे लावणे व छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पाठपुरावा केला होता. याची दाखल घेत पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी रूपरेषा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

त्याअनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार यांनी चमू सह, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे अमोल थेरे,शरद गेडाम, बबलु सातपुते, राजेश मोरपाका, शाम आरकिल्ला यांनी रस्त्याची पाहाणी केली. याचा आराखडा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

लवकरच कबीर पेट्रोल पंप, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बेलोरा पुल, म्हातारदेवी रस्त्यापर्यंत रस्त्यावर पथदिवे लागण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मागणीला यश आले आहे.

advt