कवठाळा येथे ३८५ लाभार्थ्यांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप

0
414

कवठाळा येथे ३८५ लाभार्थ्यांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप

जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती

 

कोरपना/प्रतिनिधी : तालुक्यातील कवठाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागातर्फे नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य शिवचंद्र काळे यावेळी होते. तर उदघाटक जिल्हा परिषद सदस्य वीणा मालेकर या होत्या. येथील डॉक्टर मेडिकल आँफिसर बावने यांनी विशेष लक्षपूर्वक कामगिरी बजावली होती. कवठाळा ग्रामपंचायतीचे सरपंच नरेश सातपुते यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

सदर शिबिराचा लाभ हा समाजातील गरजू नागरिकांपर्यत पोहचला पाहिजे. तसेच त्यामाध्यमातून समाजातील वंचित घटकांना आपण न्याय देऊ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी केले.

या शिबिरात एकूण ३८५ लाभार्थ्यांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिरात कवठाळा व परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मेडिकल आँफिसर बावने, डॉ. तडवी, आरोग्य सहाय्यक खामनकर, आरोग्य सेवक माथनकर, mpw वाघमारे, दुपारे, कुळमेथे, DATA आँपरेटर सचिन झाडे, परिचर मोटघरे, चौधरी आणि वाहनचालक भारत जिवने व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here