रांका-भाजप पॅनलचा कोठारी सोसायटीवर ताबा

0
818

रांका-भाजप पॅनलचा कोठारी सोसायटीवर ताबा
*काँग्रेस पॅनलचा दारुण पराभव
*सहकार विकास आघाडीचा दणदणीत विजय

 

कोठारी, राज जुनघरे
बल्लारपूर तालुक्यातील पंचक्रोशीत नामांकित आणि प्रतिष्ठेची विवध सहकारी संस्था कोठारी ची संचालक पदाची निवडणूक ६ मार्चला झाली.त्याची मतमोजणी ७ मार्चला करण्यात आली.त्यात रांका – भाजप आघाडीने सर्व जागा जिंकत सोसायटीवर एकतर्फी विजय मिळवीत ताबा मिळविला. आणि दोन अनपोज जागा बळकाल्या.

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी सहकारी संस्था मोठी व आर्थिक दृष्ट्या सक्षम असून येथील निवडणुकीवर तालुक्यासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून होते.या निवडणुकीत भाजप दोन गटात विभाजित झाली.भाजपचा एक गट रांका सोबत तर दुसरा गट काँग्रेस सोबत आघाडी केली.या अभद्र युतीने तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता.दोन्ही आघाडीतून तेरा उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती.मात्र ऐन वेळेवर भाजप काँग्रेस सोबतची युती निवडणूकीच्या तोंडावर आपल्या सहाही उमेदवारांचे अर्ज मागे घेतले.व निवडणुकीपूर्वी सत्ताधार्यांना मैदान मोकळे केले.

सोमवार ७ मार्चला झालेल्या मतमोजणीत रांका-भाजप सहकार पॅनेलने अकराही उमेदवार निवडून आणले. याच पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध झाले होते.विजयी उमेदवार चंद्रकांत गुरू(७४३),सुनील फरकडे(७३१), सुरेश देवाळकर (७१८), वासुदेव खाडे(७२५),गुरू बुरांडे(७२४), प्रमोद वासाडे (७००),सोमेश्वर पदमगिरीवर(७३२),गोपाळ बोबाटे (७३६), बंडू वासाडे (७३४),राजकुमार परेकर(७५०),विनोद राऊत (७४०), मंदा बावणे व बालिका चलाख या तेराही उमेदवानी बाजी मारली.

या सोसाटीमध्ये कोठारी, कवडजई, आमडी,पळसगाव, इटोली, मनोरा या गावातील १४२३ शेतकरी सभासदापैकी ९५० मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. मागील वीस वर्षांपासून सत्ताधारी आघाडीची सत्ता होती .सत्ताधाऱ्यांना सत्तेबाहेर करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला मात्र विरोधकांना यश आले नाही.यावेळी काँग्रेसने एकतर्फी किल्ला लढविण्याचा चंगला प्रयत्न केला मात्र त्यांचेवर मतदारांनी विश्वास दाखविला नाही.त्यांना या निवडणुकीत एकही संचालक निवडून आणता आला नाही.निवडून आलेल्या सर्व संचालकांचे परिसरातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here